By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 13:52 IST
1 / 8अभिनेत्री रिचा चड्ढा सध्या जाम चर्चेत आहे. होय, रिचाच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. तिचे नवे हॉट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.2 / 8नव्या फोटोशूटमध्ये रिचाचं गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळतंय. रिचाने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत.3 / 8ताज्या फोटोत रिचा ब्लॅक थाई स्लिट गाऊनमध्ये दिसतेय. तिचा हा हॉट लुक पाहून अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.4 / 8रिचा सोशल मीडियामध्ये पीजी डिप्लोमा करण्यासाठी मुंबईत आली होती. रिचाच्या पालकांची इच्छा होती की, तिने टीव्ही पत्रकार व्हावे, मात्र नशिबाने रिचासाठी दुसरा मार्ग निवडला होता.5 / 8मुंबईत आल्यानंतर रिचाने मॉडेलिंग सुरू केले आणि थिएटर करायला सुरुवात केली. यानंतर ती ‘ओये लकी, लकी ओये!’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर कमाल दाखवली नाही, पण रिचाचा अभिनय सर्वांनाच आवडला.6 / 8अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये ‘नगमा खातून’ ही व्यक्तिरेखा साकारून रिचा सर्वांची आवडती बनली.7 / 8यानंतर रिचाला एकापेक्षा एक चित्रपट मिळाले ज्यात ‘फुक्रे’, ‘शॉर्ट्स’ आणि ‘राम-लीला’ यांचा समावेश आहे. रिचाने ‘फुकरे’मध्ये ‘भोली पंजाबन’ बनून लोकांची मने जिंकली. तर, तिने ‘राम लीला’मध्ये दीपिकाच्या वहिनीची भूमिका साकारून समीक्षकांची मने जिंकली. 8 / 8रिचा तिच्या चित्रपटांसोबतच अभिनेता अली फजलसोबतच्या नात्याबद्दलही चर्चेत आहे. अली आणि रिचा यांची भेट ‘फुक्रे’ चित्रपटाच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. यानंतर त्यांचे प्रेम हळूहळू बहरले आणि 2019 मध्ये रिचाच्या वाढदिवशी अलीने तिला लग्नासाठी प्रपोज केले.