Join us

Rhea Chakraborty : "मला पुन्हा जेलमध्ये जायचं नाही"; रिया चक्रवर्ती घाबरली, आठवले वाईट दिवस अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:27 IST

1 / 9
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणात तिला याआधी जेलमध्येही जावं लागलं होतं.
2 / 9
रिया जेलमध्ये घालवलेले तिचे ते वाईट दिवस कधीही विसरू शकत नाही. जेलच नाव काढलं तरी ती आता घाबरते.
3 / 9
अभिनेत्री एमटीव्ही रोडीजची गँग लीडर आहे. अलिकडच्या भागात, शोमध्ये रियाला जेलबद्दल वाटत असलेली भीती पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
4 / 9
रणविजयने गँग लीडर्स टास्कसाठी जेलमध्ये बंद होतील असं सांगितलं. तेव्हा रिया गमतीने म्हणाली- मला पुन्हा जेलमध्ये जायचं नाही. मी जाणार नाही.
5 / 9
प्रिन्सने तेव्हाच एल्विशला टोमणा मारला. एल्विशलाही असंच वाटलं, त्यालाही जेलमध्ये जायचं नव्हतं असं म्हटलं.
6 / 9
रिया चक्रवर्तीने याआधी अनेक मुलाखतीत जेलमधील जुन्या दिवसांवर भाष्य केलं आहे. वाईट अनुभव सांगताना ती ढसाढसा रडली होती.
7 / 9
सीबीआयकडून क्लीनचिट मिळाल्यानंतर, रिया सोमवारी तिचे वडील आणि भाऊ शोविकसोबत सिद्धिविनायक मंदिरात गेली.
8 / 9
२०२० मध्ये सुशांतने आत्महत्या केली. सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि इतर लोकांनी अभिनेत्याच्या मृत्यूसाठी रियाला जबाबदार धरलं होतं.
9 / 9
टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतटिव्ही कलाकारतुरुंग