Join us

'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:34 IST

1 / 10
नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाचा काल पहिला टीझर (Ramayana Film First Look) प्रदर्शित झाला. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या टीझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 'रामायण'मध्ये रामाच्या रूपातील रणबीर झाडावर चढून धनुष्य बाण साधताना दिसला. त्याची ही झलक पाहून चाहते अक्षरश: वेडे झाले आहेत.
2 / 10
'रामायण' हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग २०२६ च्या दिवाळीला आणि दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीला रिलीज होणार आहे. अजून प्रदर्शनाला वर्षभराहून अधिक वेळ असला तरी, या चित्रपटाविषयी चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. विशेषतः चित्रपटातील स्टारकास्ट (Ramayan Movie Starcast) पाहता प्रेक्षकांचा उत्साह अजूनच वाढला आहे.
3 / 10
रणबीर कपूर हा भगवान राम यांच्या तर साई पल्लवी ही माता सीता (Sai Pallavi as Sita) यांच्या रुपात पाहायला मिळणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार हा यश (Yash As Ravan) हा रावणाच्या भुमिकेत आहे.
4 / 10
सनी देओलने हनुमानाची (Sunny Deol as Hanuman) शक्तिशाली भूमिका साकारली आहे. अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाच्या ( Ravi Dubey As Laxman) भूमिकेत दिसणार आहे. तर मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा भरत Adinath Kothare As Bhara ही भुमिका साकारेल.
5 / 10
अरुण गोविल हे राजा दशरथ (Arun Govil As King Dasharath) यांच्या भुमिकेत पाहायला मिळतील. इंदिरा कृष्णन या राणी कौशल्या (Indira Krishnan As Queen Kaushalya) हे पात्र साकारणार आहेत. अभिनेत्री लारा दत्ता ही कैकेयी (Lara Dutta As Kaikeyi), तर अभिनेत्री शीबा चड्ढा ही मंथराच्या (Sheeba Chaddha As Manthra) भुमिकेत असेल.
6 / 10
विशेष म्हणजे महानायक अमिताभ बच्चन हेदेखील रामायणामध्ये (Amitabh Bachchan in Ramayan)पाहायला मिळणार आहेत. ते जटायू हे (Amitabh Bachchan As Jataau) पात्र साकारतील. रावणाने सीतामाईचं हरण केलं, तेव्हा जटायूने सीतामाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रावणाने जटायूला जखमी केलं होतं.
7 / 10
तर अनिल कपूर हा राजा जनक (Anil Kapoor As King Janak) यांच्या भुमिकेत असेल. तर विजय सेतुपतीदेखील 'रामायण'मध्ये पाहायला मिळणार आहे. तो रावणाचा भाऊ विभीषण (Vijay Sethupathi As Vibhishan) या भुमिकेत दिसले. तर बॉबी देओल हा कुंभकर्ण (Bobby Deol As Kumbhakaran) ही भुमिका साकारणार आहे.
8 / 10
विक्रांत मेसी हा मेघनाद (Vikrant Massey As Meghnath) या भुमिकेत दिसेल. मेघनाद हा रावणाचा पुत्र होता. याने एके काळी इंद्राला जिंकले होते म्हणून याला इंद्रजित असेही म्हणत. तर रकुल प्रीत सिंह ही रावणाची बहीण शूर्पणखा (Rakul Preet As Shurpanakha) हिच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. तर अभिनेत्री काजल अग्रवाल ही रावणाची पत्नी मंदोदरी (kajal aggarwal As Mandodari) ही भुमिका साकारेल.
9 / 10
महादेव ही भुमिका मोहित रैना (Mohit Raina) साकारणार आहे. तर विवेक ओबेरॉय हा विद्युतजीव (Vivek Oberoi As Vidyutjiva), कुणाल कपूर हा इंद्र देव (Kunal Kapoor As Lord Indra) भुमिकेत पाहायला मिळेल. तथापि, 'रामायण'मधील संपुर्ण स्टारकास्टची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी Zoomनं स्टारकास्टवर रिपोर्ट प्रदर्शित केलाय.
10 / 10
'रामायण' हा चित्रपट केवळ एक धार्मिक कथेचं सादरीकरण नाही तर एक भव्य-दिव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. VFX, स्टारपावर आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन या सिनेमात पाहायला मिळेल. यामुळे हा प्रोजेक्ट ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
टॅग्स :रामायणरणबीर कपूरसाई पल्लवीसनी देओलअमिताभ बच्चनकाजल अग्रवालअनिल कपूरबॉबी देओलविक्रांत मेसीयशरवि दुबेविवेक ऑबेरॉयलारा दत्ता