Join us

१८ वर्ष लहान मराठी अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहतोय 'हा' अभिनेता; म्हणाला, "लग्न का करायचं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:34 IST

1 / 8
मनोरंजनविश्वात असे अनेक कपल आहेत ज्यांच्या वयात कमालीचं अंतर आहे. काही जोड्यांमध्ये तर अभिनेत्री या अभिनेत्यांहून मोठ्या आहेत.
2 / 8
एक अशी जोडी आहे जी अनेक वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत आहे. मात्र दोघांनी अद्याप लग्न केलेलं नसून त्यांचा तसा विचारही नाहीए. कोण आहे हे कपल?
3 / 8
तर ही जोडी आहे राहुल देव(Rahul Dev)-मुग्धा गोडसे (Mugdha Godse). राहुल देव हिंदी सिनेसृष्टीतला लोकप्रिय चेहरा तर मुग्धा गोडसे 'फॅशन' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली होती.
4 / 8
राहुल देवच्या पहिल्या पत्नीचं २००९ साली कॅन्सरने निधन झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. मुग्धाला भेटल्यानंतर राहुल परत प्रेमात पडला. २०१५ साली दोघांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.
5 / 8
तेव्हापासून राहुल देव आणि मुग्धा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही. राहुल आता ५६ वर्षांचा असून मुग्धा ३८ वर्षांची आहे.
6 / 8
एका मुलाखतीत राहुल देव म्हणाला होता की, 'आम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. जर दोघं जण एकमेकांसोबत आनंदी आहेत तर लग्न करणं गरजेचं नाही. लग्न केलं काय अन् नाही केलं काय काहीही फरक पडत नाही.'
7 / 8
दोघांमध्ये १४ वर्षांचं अंतर आहे. यावर मुग्धा म्हणाली होती की, 'मला कधीच आमच्या वयातील अंतराची जाणीव झाली नाही. तुमचं जर त्या व्यक्तीवर प्रेम असेल तर इतर गोष्टी महत्वाच्या वाटत नाहीत.'
8 / 8
गेल्या ९ वर्षांपासून राहुल आणि मुग्धा लिव्ह इनमध्ये राहत आहेत आणि आनंदी आहेत. त्यांच्या ९ व्या अॅनिव्हर्सीला त्यांनी व्हिडिओही शेअर केला होता ज्यात दोघंही एकदम खूश दिसत होते.
टॅग्स :राहुल देवमुग्धा गोडसेरिलेशनशिपलग्नमराठी अभिनेता