Join us

एकेकाळी काजोलवर पडलेली भारी! 'प्यार किया तो डरना क्या' मधील 'ही' अभिनेत्री आठवतेय? 'या' कारणामुळे सोडली इंडस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:16 IST

1 / 8
अभिनेता सलमान खान आणि अरबाज खान यांची मुख्य भूमिकेत असलेला 'प्यार किया तो डरना क्या' हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला.
2 / 8
सोहेल खान दिग्दर्शित या रोमकॉम चित्रपटाला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. सलमानसह या सिनेमात अरबाज खान, काजोल आणि धर्मेंद्र, अंजाला झवेरी यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. या चित्रपटांची कथा आणि कलाकारांचा अभिनय या सगळ्या गोष्टी रसिकांच्या पसंती उतरल्या.
3 / 8
चित्रपट प्रदर्शित होऊन २७ वर्षे झाली आहेत आणि त्यातील पात्रे अजूनही लोकांच्या आठवणीत कायम आहेत.
4 / 8
अभिनेता अरबाज खानने चित्रपटात विशाल ठाकूर नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात अंजला जावेरीने अरबाज खानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
5 / 8
अगदी मोजकाच स्क्रिन टाईम मिळूनही तिने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. इतकंच नाहीतर अंजालाचा अभिनय आणि सौंदर्य पाहून प्रेक्षकांनी तिची तुलना काजोलबरोबर केली होती.
6 / 8
अंजला जावेरीचा जन्म हा लंडनमध्ये झाला. मात्र, विनोद खन्ना यांनी तिला चित्रपटांमध्ये लाँच केले होते. हिमालय पूत्र या चित्रपटातून त्यांनी हा नवा चेहरा इंडस्ट्रीला मिळवून दिला.
7 / 8
'प्यार किया तो डरना क्या' नंतर अंजालाने 'बेताबी' सिनेमा केला होता. यात चंद्रचूड़ सिंह, अरशद वारसी, मयूरी कांगो होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही चालला नाही. पण कथा लोकांना आवडली होती.
8 / 8
लग्नानंतर अंजला सिनेसृष्टीपासून दुरावली गेली. अंजला जावेरीचे लग्न अभिनेता तरुण अरोराशी झालं आहे. तरुण देखील एक उत्तम अभिनेता आहे. तरुणने 'जब वी मेट'मध्ये करीना कपूरचा बॉयफ्रेंड अंशुमनची भूमिका साकारून आपली छाप पाडली होती.
टॅग्स :बॉलिवूडकाजोलसलमान खानअरबाज खानसेलिब्रिटीसिनेमा