Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोनसोबतच्या सिनेमासाठी प्रभास घेणार रेकॉर्ड ब्रेक मानधन, किती ते वाचून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 13:13 IST

1 / 11
साउथचा सुपर स्टार प्रभास लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत नाग अश्विनच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात दीपिकाची अधिकृत एन्ट्री झाल्यावर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. तसेच या दोघांनाही एकत्र मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी त्यांचे फॅन्सही आतुर झाले आहेत.
2 / 11
अशात या सिनेमाबाबत एक अशी बातमी समोर आली जी वाचून सगळेच हैराण होतील. प्रभास या सिनेमासाठी फार मोठी रक्कम घेणार असल्याची चर्चा आहे.
3 / 11
Tollywood.net या वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, अभिनेता प्रभास दीपिकासोबतच्या या सिनेमासाठी ५०, ६० किंवा ७० नाही तर तब्बल १०० कोटी रूपये घेणार आहे.
4 / 11
रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी साउथचा सुपरस्टार प्रभास पूर्ण ७० कोटी रूपये चेकने घेणार आहे. तर ३० कोटी रूपये तो डबिंग राइट्सचे घेणार आहे. इतकेच नाही तर यासोबतच प्रभास भारतातील हायएस्ट पेड अभिनेता बनला आहे.
5 / 11
खास बाब ही आहे की, या सिनेमाच्या माध्यमातून मानधनाबाबत प्रभासने रजनीकांतलाही मागे सोडले आहे. याआधी रजनीकांतने त्यांच्या 'दरबार' सिनेमासाठी ७० कोटी रूपये मानधन घेतलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन गजनी फेम एआर मुरूगदान याने केलं होतं.
6 / 11
खास बाब म्हणजे ज्यावेळी दीपिका पादुकोनची या सिनेमात एन्ट्री झाली होती. तेव्हा काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते की, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन हिलाही मोठी रक्कम मिळणार आहे.
7 / 11
रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, दीपिका या सिनेमासाठी २१ कोटी रूपये घेणार आहे.
8 / 11
दीपिका पादुकोन आणि प्रभासची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा दिग्दर्शक नाग अश्विन वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज करणार आहे.
9 / 11
दरम्यान प्रभास पूजा हेगडे सोबतच्या बॉलिवूड 'राधे श्याम' सिनेमामुळे आधीच चर्चेत आहे.
10 / 11
इतकेच नाही तर टी-सीरीजचा मालक भूषण कुमार यानेही प्रभासला एका पौराणिक कथेवर आधारित सिनेमाची ऑफर दिल्याची चर्चा आहे.
11 / 11
ही कथा प्रभासला आवडली असून सिनेमाला होकार दिल्याची चर्चा आहे. पण याबाबत प्रभासने अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही.
टॅग्स :प्रभासदीपिका पादुकोणबॉलिवूड