By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:37 IST
1 / 7'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरी हिने ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. परंतु आता महिमा नव्हे तर तिच्या मुलीची चर्चा आहे.2 / 7महिमा चौधरीच्या मुलीचं नाव अरिना असं आहे. सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत अरिनाने आईलाही मागे टाकलं आहे, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.3 / 7नुकत्याच समोर आलेल्या एका कार्यक्रमातील फोटोंमध्ये अरिना इतकी सुंदर दिसत आहे की, नेटकऱ्यांनी तिची तुलना चक्क हॉलिवूड स्टार सेलेना गोमेझशी (Selena Gomez) करण्यास सुरुवात केली आहे.4 / 7यावेळी अरिनाने परिधान केलेला ड्रेस आणि तिचा एकूणच 'रॉयल' अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. आईप्रमाणेच तिच्यातही एक सौंदर्याची वेगळीच चमक दिसून येत होती.5 / 7अरिनाचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला. काहींनी तिची तुलना महिमा चौधरीच्या तरुणपणातील 'परदेस'मधील लूकशी केली.6 / 7'सौंदर्याच्या बाबतीत तिने आपल्या आईलाही मागे टाकले आहे,' अशा आशयाच्या कमेंट्स अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.7 / 7अरिना सध्या आपल्या शिक्षणात व्यस्त असली, तरी तिच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.