'छावा' अन् 'धुरंधर'पेक्षा 'ही' ठरलेला सरस! 'या' चित्रपटाने २ दिवसांतच पार केलेला १०० कोटींचा आकडा, तुम्ही पाहिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:14 IST
1 / 7२०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी अगदीच खास ठरलं आहे. या वर्षात विविध कथानक असलेले आणि वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित झाले. 2 / 7 हृतिक रोशन आणि ज्यूनिअर एनटीआर स्टार वॉर-२ चित्रपटाचं नाव या यादीत अव्वल स्थानावर आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केल. फक्त २ दिवसांत वॉर-२ ने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली होती. १४ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. 3 / 7 अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली . हा चित्रपट प्रदर्शित होऊन इतके दिवस होऊनही चित्रपटाचा बोलबाला कायम आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७४ कोटींचा व्यवसाय केला होता. 4 / 7विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा चित्रपट चांगलाच गाजला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं चाहत्यांसह समीक्षकांनी तोंडभरुन कौतुक केलं. चित्रपटाने पहिल्या दिवसांत ३१ कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र, १०० कोटी कमावण्यासाठी चित्रपटाला तीन दिवस लागले.5 / 7 छावानंतर रणवीर सिंगचा धुरंधर हा चित्रपट कमी कालावधीत १०० कोटींचा आकडा पार करणारा चित्रपट ठरला आहे. धुरंधरने २७ कोटींचं कलेक्शन करत बॉक्स ऑफिसवर आपलं खातं उघडलं. त्यानंतर तीन दिवसात आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने १०२ कोटींचा व्यवसाय केला आहे.6 / 77 / 7 या यादीत अक्षय कुमारचा हाऊसफुल्ल-५ पाचव्या स्थानवर आहे. चित्रपटाला १०० कोटींचा पल्ला गाठण्यासाठी ५ दिवसांचा कालावधी लागला.