By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:26 IST
1 / 8नमित मल्होत्रा प्रस्तुत आणि नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'रामायण' या हिंदी चित्रपटाचा पहिला टीझर अखेर समोर आला आहे. हनुमान जयंतीचं औचित्य साधून या चित्रपटातील मुख्य पात्र प्रभू श्रीरामाच्या व्यक्तिरेखीची ओळख करून देण्यात आली. 2 / 8दरम्यान, २०१७ मध्ये 'रामायण' सिनेमाची घोषणा करुन देण्यात आली होती. अखेरीस यंदा २०२६ मध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 3 / 8 यामध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे.७ वर्षांचा कालावधी अन् १० हजार लोकांचे अपार परिश्रमानंतर हा प्रोजेक्ट पूर्णत्वास आला आहे.4 / 8सिनेमाची घोषणा झाल्यापासून आजच्या काळातील वाटणारा अभिनेता प्रभू श्री रामाच्या भूमिकेत कितपत सामावेल? असा अनेकांना प्रश्न पडला होता. 5 / 8 परंतु, रणबीरने ही शंका दूर केली आहे. डोई सुवर्ण मुकुट,रेशमी वैभवात असो, किंवा संन्यासी साधेपणात; तो आपल्या मनात आधीपासून वसलेल्या ‘राम’च्या प्रतिमेशी इतका सहज जुळून येतोय.6 / 8जणू त्याने स्वतःला एका कालातीत साच्यात विलीन करून टाकलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'रामायण'चा टीझर अगदीच मनाला स्पर्शून जाणारा आहे. यामध्ये रणबीर कपूरने साकारलेले ‘राम’आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतात.7 / 8' रामायण' हे जागतिक स्तरावर पोहोचणारे भारतीय महाकाव्य आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून जपली गेलेली रामायणाची कथा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर या मांडण्यात येत आहे.8 / 8 या चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीता माता, रवी दुबे लक्ष्मण, यश रावणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.