By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 19:11 IST
1 / 7 प्रसिद्ध गायक आणि रॅपर एपी धिल्लन (AP Dhillon) ची 'एपी धिल्लन: फर्स्ट ऑफ अ काइंड' ही सिरीज अॅमझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. रॅपर एपी धिल्लनने काही दिवसांपुर्वी बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी या सिरीजची खास स्क्रीनिंग ठेवली होती. अभिनेता रणवीर सिंहला ही सिरीज आवडल्याचे त्याने सांगितले. 2 / 7अभिनेता राजकुमार राव हा ‘गन्स अँड गुलाब’ या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ही सिरीज मर्डर, मिस्ट्री आणि देसी भाषेवर आधारीत आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही ही सिरीज पाहू शकता. 3 / 7अभिनेत्री नुसरत भरुचा 'अकेली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. जर तुम्हाला आंतकवादाशी संबंधित असलेले काही पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 4 / 7अभिनेत्री तमन्ना भाटियाची 'आखिरी सच' ही क्राईम-थ्रिलर सिरीज बुरारी हत्याकांडावर आधारित आहे. डिस्ने+हॉटस्टारवर ही सिरीज उपलब्ध आहे. आखरी सचमध्ये तमन्ना एक महिला पोलिस अधिकारी म्हणून दिसत आहे. 5 / 7आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल २' हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्लचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटात आयुषमान दुहेरी भूमिकेत आहे. आयुषमान या चित्रपटात स्त्री व्यक्तिरेखा साकारतानाही दिसणार आहे.6 / 7लखन लीला भार्गव या वेब सिरीजमध्ये रवी दुबे एका जबरदस्त भुमिकेत पाहायला मिळत आहे. या वेब सिरीजमध्ये कोर्ट रुम ड्रामा पाहायला मिळतोय. 7 / 7काजोलची 'द ट्रायल' या वेब सीरिज रिलीज झाली आहे. 'ट्रायल-प्यार, कानुन, धोका’ ' या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळतो. द ट्रायल ही ‘द गुड वाईफ’ शोचा रिमेक आहे. मूळ शोमध्ये ज्युलियाना मार्गुइल्स मुख्य भूमिकेत होती.