By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:21 IST
1 / 9धुळ्याची लेक, मराठी मुलगी मृणाल ठाकुर आज हिंदीसह साउथ सिनेसृष्टीत डंका गाजवत आहे. मृणाल सोशल मीडियावर तरुणाईची क्रश बनली आहे.2 / 9गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव अभिनेता धनुषसोबत जोडण्यात येत होतं. दोघं या महिन्यात लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचं मृणालने स्पष्ट केलं. 3 / 9सध्या मृणाल आगामी 'दो दीवाने शहर मे' सिनेमामुळे चर्चेत आहे. यात तिची सिद्धांत चतुर्वेदीसोबत जोडी जमली आहे. सिनेमात सध्याच्या पिढीला आपलीशी वाटेल अशी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.4 / 9या सिनेमाच्या निमित्ताने नवभारत टाईम्सशी बोलताना मृणालने प्रेम, आकर्षण, लग्न यावर भाष्य केलं. दुसरी ते सातवीपर्यंत तिला एक मुलगा आवडत होता. पण ती इतकी लाजाळू होती की ती कधीच त्याला सांगू शकली नाही. नंतर तिच्या वडिलांची बदली झाली आणि ती दुसऱ्या शहरात गेली.5 / 9लग्नाबद्दल मृणाल म्हणाली, 'मला वाटतं आपले पालक लग्न कर म्हणून आपल्या मागे लागतात त्यात काही चूक नाही. लग्न वेळीच झालेलं योग्य आहे. आधी मला हे समजायचं नाही पण आता कळत आहे.'6 / 9'आपल्या हातांची पाच बोटं जशी एक होऊ शकत नाही तसंच आयुष्यात सगळं एकसारखं होऊ शकत नाही. आधी मी विचार करायचे की करिअर सेट करेन मग लग्न करेन. पण आता मी तसा विचार करत नाही.'7 / 9'आपल्या इंडस्ट्रीतच अशा कित्येक अभिनेत्री आहेत ज्यांचं लग्न झालंय, करिअरही चांगलं सुरु आहे आणि त्यांना मुलंही झाली आहेत. जर तुम्ही आत्ता लग्न करणार नाही तर मग कधी करणार?'8 / 9'लग्नाचा दबाव माझ्यावरही होता. पण मी आईबाबांना एक सांगितलं होतं की करायचं म्हणून मी लग्न करणार नाही. रिलेशनशिप्समध्येही मी कधीच रिजेक्ट झाले नाही. एकमेकांच्या सहमतीने आम्ही वेगळे झालो. पण प्रेमात नकार मिळण्याची वेळ कधी आली नाही.9 / 9'मी आजही प्रेमाच्या शोधात आहे. लग्न करायचं ही तर माझी लहानपणापासूनची इच्छा आहे. लाल लेहेंगा, लाल बांगड्या घालून तयार व्हायचं आहे. भांगेत सिंदूर भरायचं आहे. मंगळसूत्र घालायचं आहे. मला वाटतं ही प्रत्येक मुलीची इच्छा असते फक्त तसा जोडीदार मिळायला हवा ज्याच्याकडून बघून वाटलं पाहिजे की हो, हाच तो!'