By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:01 IST
1 / 7हिंदी आणि साउथमध्ये आघाडीवर असलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर. मृणालने नुकत्याच शेअर केलेल्या मराठमोळ्या लूकवरुन अनेकांची नजरच हटत नाहीये.2 / 7अस्सल महाराष्ट्रीयन लूक म्हटलं की साडी आलीच. मृणालने हिरव्या रंगाची ही जरतारी पैठणी नेसली आहे. साडीला लाल-केशरी रंगाची काठ आहे. मॅचिंग डिझायनर ब्लाऊज आहे.3 / 7मृणालने ही साडी अगदी मराठमोळ्या अंदाजात स्टाईल केली आहे. गळ्यात सुंदर हार घातला आहे. इअररिंग्स आणि साजेशा बांगड्याही आहेत. महत्वाचं म्हणजे तिने एक छानशी नथही घातली आहे.4 / 7कपाळी चंद्रकोर, केसात गजराही माळला आहे. तिच्या ब्लाऊजची जिझाऊन तर कमाल दिसत आहे. या लूकमध्ये मृणालचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.5 / 7या गोड लूकमध्ये मृणालने एकापेक्षा एक पोज देत लक्ष वेधून घेतलं आहे. 'थोडी मॉडर्न...पूर्ण मराठी' असं खास कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.6 / 7तिचे हे फोटो पाहून एका चाहत्याने तर तिला थेट लग्नासाठीच मागणी घातली आहे. 'लग्न कधी करायचं मग?' अशी कमेंट त्याने केली आहे.7 / 7लग्नाच्या या सीझनमध्ये मृणाल कुटुंबासोबत छान तयार झाली आहे. तिने आईवडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबतही फोटो शेअर केला आहे.