Join us

मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 17:50 IST

1 / 10
अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चांगलंच नाव कमावलंय.
2 / 10
मृणाल ठाकूर मूळची धुळे जिल्ह्यातील आहे. 'कुमकुम भाग्य' या मालिकेत मृणालने काम केलं होतं. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.
3 / 10
मृणाल ठाकूरची 'सुपर ३०'मधील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर ती जॉन अब्राहमसोबत 'बाटला हाऊस' आणि शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटातही दिसली.
4 / 10
आपल्या अभिनयाच्या जोरावर मृणालने बॉलिवूडसह अनेक हीट दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत.
5 / 10
मृणाल ठाकूर सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याच्या मृणाल प्रेमात असल्याचं बोललं जात आहे.
6 / 10
मृणालने 'सीता रामम' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून तेलुगू चित्रसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात सुमंत खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता.
7 / 10
याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मृणाल आणि सुमंत एकमेकांच्या जवळ आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांमध्ये मैत्री झाली आणि ही मैत्री आता प्रेमात रुपांतरित झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
8 / 10
दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचंही समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर काही माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, मृणाल आणि सुमंत लग्नाचा विचार करत असल्याचीही शक्यता आहे. मात्र यावर दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
9 / 10
सध्या मृणाल आणि सुमंत यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर मिळालाय.
10 / 10
सुमंत यांचं यापूर्वी अभिनेत्री कीर्ती रेड्डी हिच्याशी लग्न झालं होतं. काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.
टॅग्स :मृणाल ठाकूररिलेशनशिप