By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:42 IST
1 / 9'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसा भोसले आणि फरमान यांचं लग्न आता मोठ्या वादात सापडलं आहे. मोनालिसा अल्पवयीन असल्याची तक्रार मिळाल्यानंतर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावत चौकशीचे आदेश दिले आहेत.2 / 9न्यायालयाच्या या आदेशानंतर मोनालिसाच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महादेवाचे आभार मानले आहेत. सनोज मिश्रा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ते भगवान शंकराची आराधना करताना दिसत आहेत.3 / 9सनोज यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'महादेव लवकरच माझा वनवास संपवतील, कायद्याने आपलं काम सुरू केलं आहे. मोनालिसा 'लव्ह जिहाद'मध्ये अडकल्यानंतर मी सर्व कामं सोडून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली.'4 / 9'आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे. आपण लवकरच विजयी होऊ शकतो आणि कट रचणारा जिहादी जेलमध्ये जाणारच. या लढाईत माझ्या 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटाचं मोठं नुकसान झालं.'5 / 9'कर्जाच्या ओझ्यासोबतचत्या जिहादीने मोनालिसाच्या माध्यमातून माझ्यावर खोटे आरोप लावले. मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. सातत्याने धमक्याही मिळाल्या, पण तुम्हा सर्वांनी हे धर्मयुद्ध थांबू दिलं नाही.'6 / 9'महाकुंभ व्हायरल गर्ल'ने ११ मार्च रोजी केरळमधील अरुमन्नूर येथे तिचा सह-कलाकार फरहानसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. कुटुंबातील सदस्य जबरदस्तीने चुलत भावाशी लग्न लावून देत असल्याचा दावा मोनालिसाने केला होता. 7 / 9मोनालिसाने असंही म्हटलं होतं की, जर फरहानने तिच्याशी लग्न केलं नसतं तर तिने स्वतःचं आयुष्य संपवलं असते. जेव्हा मोनालिसाच्या वयावरून वाद निर्माण झाला, तेव्हा तिने कागदपत्रे दाखवून आपण अल्पवयीन नसल्याचा दावा केला होता.8 / 9लग्नानंतर मोनालिसाने आपल्या कुटुंबावर आणि सनोज मिश्रा यांच्यावरही अनेक गंभीर आरोप केले होते. शूटिंग दरम्यान सनोज मिश्रा यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता असा खळबळजनक आरोप तिने केला होता.9 / 9आता मोनालिसाच्या लग्नाचं हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या कायदेशीर लढाईत कोणाचा विजय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.