Join us

Mohit Raina : 'देवों के देव महादेव'फेम मोहित रैनानं गुपचूप उरकलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 19:35 IST

1 / 6
देवों के देव महादेव या पौराणिक कथा छोट्या पडद्यावर झळकणार्या मालिकेतील अभिनेता मोहित रैना यांनी गुपचूप लग्न उरकलं. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी मोहित यांनी चाहत्यांना सरप्राईज दिलंय.
2 / 6
मोहित यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो शेअर करत याबाबतचा खुलासा केला आहे. आदिती सोबत मोहित यांनी लग्नगाठ बांधली आहे.
3 / 6
आदिती आणि मोहित यांच्या नवीन जीवनप्रवासासाठी चाहत्यांना प्रेम आणि आशीर्वाद मोहितने इंस्टा पोस्टवरुन मागितले आहेत.
4 / 6
मोहित-आदितीच्या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून नवदाम्पत्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
5 / 6
मोहितने नवरदेवाचा पोशाष म्हणून व्हाईट कलरचा शेरवानी भरजरी ड्रेस परिधान केला आहे. तर, आदितीने पस्टल रंगाच्या लहंग्यात आणखीनच सुंदर दिसतेय.
6 / 6
मोहित रैना देवों के देव महादेव या मालिकेत भगवान शिवशंकर यांची भूमिका निभावली होती. तसेच, उरी चित्रपटाक विकी कौशलसोबतही मोहितने काम केलं आहे. मात्र, मोहितच्या देवों के देव महादेव मालिकेतील भूमिकेचं सर्वत्र कौतूक झालं होतं.
टॅग्स :लग्नबॉलिवूड