By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:17 IST
1 / 12व्हायरल गर्ल मोनालिसा भोसलेबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे. मोनालिसा अल्पवयीन असल्याच्या दाव्यांवर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) तपासानंतर नवा ट्विस्ट समोर आला आहे. ती अल्पवयीन असल्याचं तपासात सिद्ध झालं आहे. 2 / 12मोनालिसाशी लग्न करणाऱ्या फरमान खानच्या अडचणीत यामुळे मोठी वाढ झाली असून त्याच्याविरुद्ध खरगोन जिल्ह्यातील महेश्वर पोलीस ठाण्यात 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे.3 / 12NCST चे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांच्या नेतृत्वाखाली अधिवक्ता प्रथम दुबे यांनी केलेल्या कायदेशीर पाठपुराव्यामुळे हे सिद्ध झालं की, ज्या मोनालिसाचं सज्ञान असल्याचं सांगून लग्न लावून दिलं होतं, ती प्रत्यक्षात 'पारधी' जमातीतील एक अल्पवयीन मुलगी आहे.4 / 12प्रथम दुबे यांनी हे संवेदनशील प्रकरण १७ मार्च २०२६ रोजी आयोगासमोर अत्यंत प्रखरपणे मांडलं होतं. आयोगाला सांगितलं की, या लग्नात केरळमधील CPI-M नेत्यांचा सक्रिय सहभाग आणि PFI सारख्या संघटनांचा सहभाग ही गंभीर चिंतेची बाब आहे. 5 / 12या तक्रारीत स्पष्ट करण्यात आलं की, हे लग्न हा केवळ एक वैयक्तिक विषय नसून, 'लव्ह जिहाद'चे अस्तित्व नाकारण्यासाठी जागतिक स्तरावर एक 'खोटा नरेटिव्ह' सेट करण्याचा धोरणात्मक प्रयत्न होता.6 / 12आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या तपास पथकाने केरळपासून मध्य प्रदेशातील गावांपर्यत सखोल तपास केला आणि अवघ्या ७२ तासांत सर्व धागेदोरे शोधून सत्य समोर आणलं. 7 / 12सल्लागार प्रकाश आणि संचालक पी. कल्याण रेड्डी यांच्या तपासणीत महेश्वरच्या सरकारी रुग्णालयातील नोंदीनुसार मोनालिसा अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं. तपासाची सुरुवात केरळच्या नयनार देवा मंदिरातून झाली. 8 / 12मंदिर प्रशासनाने सांगितलं की, मोनालिसा आणि फरमान यांचं लग्न आधार कार्डवर नमूद केलेल्या वयाच्या आधारे लावलं होतं. केरळच्या पुअर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात या लग्नाची नोंदणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये मोनालिसाच्या चुकीच्या जन्म प्रमाणपत्राचा आधार घेतला होता. 9 / 12तपास पथकाला आढळलं की, हे चुकीचे प्रमाणपत्र महेश्वर नगरपालिकेतून जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर पथकाने महेश्वरच्या सरकारी रुग्णालयातील रेकॉर्ड तपासले, तेव्हा असं समजलं की मोनालिसाचा जन्म ३० डिसेंबर २००९ रोजी झाला होता.10 / 12यानुसार ११ मार्च २०२६ रोजी केरळमध्ये जेव्हा लग्न झालं, तेव्हा तिचं वय अवघे १६ वर्षे २ महिने आणि १२ दिवस होतं. महेश्वर नगरपालिकेने पूर्वी जारी केलेले चुकीचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. या कागदोपत्री पुराव्यांनी लग्नाचं कारस्थान उघड केलं.11 / 12मध्य प्रदेशातील महेश्वर पोलीस ठाण्यात पॉक्सो, बीएनएस (BNS) आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आयोगाच्या शिफारसीनंतर प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आरोपी फरमानवर कारवाई सुरू आहे. या खुलाशानंतर आयोग आता दोषींवर कडक कारवाईच्या तयारीत आहे.12 / 12आयोगाने २२ एप्रिल २०२६ रोजी केरळ आणि मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना दिल्लीतील मुख्यालयात पाचारण केले आहे. अल्पवयीन मुलीचं लग्न आणि त्यातील राजकीय व कट्टरपंथी संघटनांच्या भूमिकेचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला पाठवला जात आहे. आयोगाने स्पष्ट केलं की, दोषींना शिक्षा मिळेपर्यंत ते या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून राहतील.