1 / 8रणबीर कपूर व आलिया भट 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. आता दोघंही आईबाबा बनणार आहेत. रणबीर व आलिया लग्नाआधी एक-दोन नाही तर 5 वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण या दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात कशी झाली याबद्दल कोणालाच माहीत नाही. पण आता खुलासा झालाये.2 / 8होय, कॉफी विद करण 7 या चॅट शोमध्ये आलियाने तिच्या व रणबीरच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक खुलासे केलेत. रणबीर कपूरने कुठे प्रपोज केलं होतं, तिच्या एंजेगमेंट रिंगचा अर्थ काय, असं काय काय आलियाने सांगितलं.3 / 8 आलियाने केलेल्या खुलाशानुसार, तिच्या आणि रणबीरच्या रोमँटिक नात्याची सुरुवात नववर्षाच्या संध्याकाळी झाली होती. त्यावेळी दोघंही ‘ब्रह्मास्त्र’च्या वर्कशॉपसाठी इस्रायलला जात होते आणि ते दोघंही तेल अविवच्या फ्लाइटमध्ये होते. 4 / 8 रणबीर फ्लाइटमध्ये चढला आणि आलियाच्या बाजूला बसला. पण थोड्याच वेळात रणबीर उठून समोरच्या सीटवर गेला. कारण आलियाच्या बाजूच्या सीटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. पण नंतर सीट दुरूस्त झाली आणि तो पुन्हा आलियाच्या बाजूला येऊन बसला.5 / 8 तिने सांगितलं, जेव्हा आम्ही दोघं नंतर एकमेकांच्या बाजूला बसलो होतो तेव्हा रणबीरनं मला सांगितलं ती त्यालाही पुढे बसण्याचा कंटाळा आला होता. त्यालाही माझ्या बाजूला बसायचं होतं आणि त्याच वेळी सीट खराब झाल्यानं त्याला राग आला होता. 6 / 8 रणबीरने आलियाला कुठे प्रपोज केलं होतं तर जंगलात. होय, मासाई मारा नॅशनल पार्कच्या जंगलात रणबीरने आलियाला प्रपोज केलं होतं. तिने सांगितलं, त्याने माझ्यासाठी रिंग आणली होती आणि मला याबद्दल काहीही कल्पना नव्हती. केवळ इतकंच नाही तर हा क्षण कॅप्चर करण्यासाठी तो फोटोग्राफरही सोबत घेऊन आला होता. ते प्रपोजल खूप सुंदर होतं. मी स्वप्नातही तशी कल्पना केली नव्हती.7 / 8आलियाची एंगेजमेंट रिंग खास आहे. यामागचं कारणही तिने सांगितलं. माझ्या एंगेजमेंट रिंगवर मिसेज हिप्स्टर असं लिहिलेलं आहे. मिसेज हिप्स्टर च्या प्रत्येक शब्दाचा खास अर्थ आहे, पण मी त्या तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही, असं तिने सांगितलं.8 / 8आलिया सध्या प्रेग्नंट आहे. लवकरच ती आई होणार आहे. सोशल मीडियावर आलियाने ही गुडन्यूज शेअर केली होती. प्रेग्नंसीबद्दल सांगितल्यानंतर आलियाने तिची इन्स्टाग्राम डीपी बदलली आहे. आता तिच्या डीपीवर तिने रणबीरसोबतचा फोटो ठेवला आहे.