२००७ पासून तोच आहार घेते करीना, अभिनेत्रीच्या आहारतज्ज्ञांनी संपूर्ण डाएट प्लॅन सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:44 IST
1 / 11कलाकारांच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होते. त्यातही अभिनेत्री फिटनेस राखण्यासाठी काय करतात, हा मुद्दा चाहत्यांसाठी उत्सुकतेचा असतो. 2 / 11 बॉलिवूडमधील फिट अँड फाईन दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत करिना कपूर (Kareena Kapoor) घराण्याची लाडकी 'बेबो' देखील आहेच.3 / 11 करिना कपूरचं नेहमीच कौतुक होतं. दोन मुलांच्या जन्मानंतर तिनं ज्या पद्धतीनं वजन कमी केलं आणि आहारावर नियंत्रण ठेवलं, ते कौतुकास्पद आहे.4 / 11करिना कपूर ही प्रचंड फूडी असून वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणं तिला आवडतं. तरी ती आपल्या फिटनेसची किती काळजी घेते हे सर्वांना माहित आहे. चाहते तिला तिच्या डाएटसाठी फॉलो करतात. 5 / 11गेल्या १७ वर्षांत तिनं तिचं आहाराचं (Kareena Kapoor Khan's Diet) वेळापत्रक बदललेलं नाही. आहार आणि योग हे तिच्या फिटनेसचं रहस्य असल्याचं करिनाच्या आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर ( Rujuta Diwekar on Kareena's Diet) यांनी सांगितलं.6 / 11काही दिवसांपूर्वी ऋजुता यांनी 'लल्लनटॉप'च्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. करीना नेमकं काय डाएट फॉलो करतेय, याविषयी खुलासा केला.7 / 11करीना ही सकाळी सुकामेवा, नाश्त्याला पोहे किंवा पराठा खाते. त्यानंतर ती दुपारच्या जेवणात वरण-भात, संध्याकाळी चिज टोस्ट किंवा मँगो मिल्कशेक घेते.8 / 11तर रात्रीच्या जेवणात पुलाव किंवा तूप घालून केलेली खिचडी खाते. आठवड्यातून पाच दिवस ती सहज खिचडी खाते, असं ऋजुता दिवेकरांनी सांगितलं.9 / 11करिनानंही एका मुलाखतीमध्ये सकाळी उठल्यावर व्यायाम, संध्याकाळी सहापर्यंत जेवण आणि रात्री साडेनऊ वाजता झोपी जाणं, हे तिचं वेळापत्रक असल्याचं सांगितलं होतं. 10 / 11नियमितपणे योग करणे हा करीनाचा नियम आहे. आणि योगची सुरुवात ती सूर्यनमस्कार घालून करते. आपल्या फिटनेसमधे सूर्यनमस्काराचं महत्त्व करीनाने अनेक मुलाखतीतून सांगितलेलं आहे.11 / 11कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर करीना कपूर २०२४ मध्ये क्रू व सिंघम अगेन या दोन चित्रपटांत दिसली आहे. दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाल्याचे पाहायला मिळाले.