By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 10:36 IST
1 / 6श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर सध्या तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत येत आहे.2 / 6यामध्ये अलिकडेच जान्हवीने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने शिखरच्या नावाचं नेकलेस गळ्यात घातलं होतं. त्यामुळे तिने तिच्या नात्यावर जाहीरपणे शिक्कामोर्तब केलं आहे.3 / 6सध्या सोशल मीडियावर जान्हवीची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाचा प्लॅन सांगितला होता.4 / 6''मला तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करायचं आहे. सोन्याची जर असलेली कांजीवरम साडी आणि केसांमध्ये भरपूर मोगऱ्याचे गजरे असा मी लूक करणार आहे. माझा होणारा नवराही लुंगी नेसून असेल. आमचं लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडले. ज्यात जेवणासाठीही केळीच्या पानांचा वापर करण्यात येईल,'' असं जान्हवीने म्हटलं.5 / 6दरम्यान, जान्हवीच्या गळ्यात शिखरच्या नावाचा नेकलेस पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तिची ही मुलाखत चर्चेत आली आहे.6 / 6गेल्या काही दिवसांपासून जान्हवी आणि शिखर अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे सध्या कलाविश्वात या जोडीची जोरदार चर्चा होतीये.