Join us

Janhvi Kapoor : "मला नवरा आणि ३ मुलांसह तिरुपतीला स्थायिक व्हायचंय"; जान्हवी कपूरने लग्नाबद्दल सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:56 IST

1 / 11
अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहे. शिखर पहाडियासोबतचं अभिनेत्रीचं नातं आता सर्वांनाच माहीत झालं आहे.
2 / 11
जान्हवी कपूरने आपल्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे आणि वेडिंग प्लॅनिंगनंतरचे सर्व प्लॅन्स सांगितले आहेत.
3 / 11
अभिनेत्रीचं तिरुपतीशी खूप जूनं आणि खास नातं आहे. ती दरवर्षी आपल्या वाढदिवसाला मंदिरात जाते.
4 / 11
कोमल नाहटाच्या शोमध्ये जान्हवीने सांगितलं की, एक दिवस मी आपला पती आणि तीन मुलांसह तिरुपतीला स्थायिक होऊ इच्छिते.
5 / 11
अभिनेत्री म्हणाली, 'नवरा आणि तीन मुलांसह तिरुमाला तिरुपतीला स्थायिक होण्याचा विचार करत आहे.'
6 / 11
'ती एक साधारण जीवन जगेल. केळ्याच्या पानावर जेवेल आणि गोविंदा गोविंदा असा जप करेल.'
7 / 11
केसात मोगऱ्याचा गजरा घालावा, मणिरत्नम यांचं संगीत ऐकावं आणि नवऱ्याने लुंगी घालावी अशी जान्हवीची इच्छा आहे.
8 / 11
अभिनेत्रीने सांगितलं, तिचं लग्न हे तिरुपतीमध्ये होईल. मेहंदी आणि संगीत हे तिची आई श्रीदेवीच्या चेन्नईतील घरात होईल.
9 / 11
मोगरा आणि मेणबत्तीची पारंपारीक सजावट असेल अशा पद्धतीने ती लग्न करणार आहे. जान्हवीचे असंख्य चाहते आहेत.
10 / 11
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
11 / 11
टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूडलग्न