By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 15:10 IST
1 / 7जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधलं एव्हरग्रीन जोडी. दोघांचं वय वाढलं असलं तरीही त्यांच्यातील मैत्री अजूनही तशीच आहे.2 / 7नुकतंच जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित द ग्रेट इंडियन कपिल या शोमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा जग्गू दादांनी माधुरीसमोरच त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या.3 / 7यावेळी गप्पांच्या ओघात कपिलने जॅकी यांना विचारले की, असे कोणतं काम आहे जे करताना तुम्हाला आजही दडपण येते? त्यावर जॅकी यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे4 / 7'मला माधुरी दीक्षितसोबत पडद्यावर रोमान्स करताना खूप लाज वाटते. जेव्हा कधी आमची रोमँटिक दृश्ये असायची, तेव्हा नक्की काय करावं, हेच मला कळायचं नाही. तिचं सौंदर्य आणि तिचं व्यक्तिमत्व पाहून मी गोंधळून जायचो.', अशी प्रांजळ कबुली जग्गूदादांनी दिली.5 / 7''रोमान्स ही प्रत्येकाची खूप वैयक्तिक गोष्ट आहे. त्यामुळे माधुरीसोबत अशी दृश्य करणं खूप कठीण होतं. माधुरीसोबत रोमान्स करताना तिच्या डोळ्यांत बघून संवाद बोलणं किंवा गाणं अवघड गोष्ट होती'', असंही जग्गू दादा म्हणाले.6 / 7जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांनी ९० च्या दशकात 'खलनायक', 'परिंदा', 'देवदास', 'राम लखन' आणि '१०० डेज' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.7 / 7प्रेक्षकांना या दोघांची जोडी नेहमीच आवडली आहे. मात्र, पडद्यावर सहज दिसणारा हा रोमान्स करताना जॅकीला मात्र आतून खूप लाज वाटत होती, हे ऐकून कपिल शर्मासह उपस्थित प्रेक्षकही चकित झाले.