Join us

'मोहरा'मधील 'ही' अभिनेत्री आठवते का? 28 वर्षानंतर झालाय कमालीचा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 14:43 IST

1 / 10
अक्षय कुमार आणि रविना टंडन यांची मुख्य भूमिका असलेला 'मोहरा' चित्रपट आठवतो का? हा चित्रपट बॉक्स ऑफिसरवर तुफान गाजला होता. इतकंच नाही तर यातलं 'ना कजरे की धार' हे गाणं तर सुपरहिट झालं होतं.
2 / 10
' ना कजरे की धार' या गाण्यात अभिनेत्री पूनम झंवर झळकली होती. या गाण्यामुळेच तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. परंतु, या चित्रपटानंतर पूनम हिचा कलाविश्वातील वावर कमी झाला.
3 / 10
'मोहरा'मध्ये पूनमने प्रिया अग्निहोत्री ही भूमिका साकारली होती.
4 / 10
'मोहरा'नंतर तब्बल १८ वर्षांनी पूनम २०१२ मध्ये ‘ओ माय गॉड’ चित्रपटात झळकली.
5 / 10
विशेष म्हणजे एकेकाळी साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या पूनममध्ये कमालीचा बदल झाला आहे.
6 / 10
पूनमचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटोदेखील शेअर करते.
7 / 10
कित्येक वर्षांपासून कलाविश्वापासून दूर असलेल्या पूनमने सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक सर्जरी केल्याचं सांगण्यात येत. एका मुलाखतीत तिने स्वत: याविषयी खुलासा केला होता.
8 / 10
पूनम मूळ राजस्थानची असून ती सध्या मुंबईत स्थायिक आहे. पूनमचं ​​शालेय शिक्षण व उच्च शिक्षणही मुंबईतच झालं आहे. पूनमची आई पूजाश्री हिंदी कवयित्री असल्याचं सांगण्यात येतं.
9 / 10
चित्रपटात येण्यापूर्वी पूनम झंवर एक यशस्वी मॉडेल होती. तिने किलर जीन्स, डव्ह साबण अशा बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केले आहे. मॉडेलिंग करताना निर्माता गुलशन रॉय यांनी पूनमला मोहरा चित्रपटाची ऑफर दिली होती.
10 / 10
पूनमने ‘दीवाना हूं मैं तेरा’ आणि ‘जियाला’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा