Join us

तब्बल 18 वर्षानंतर तमन्ना भाटियाने मोडला नो किसिंग रुल; 'या' अभिनेत्यासोबत केलं लीपलॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 14:09 IST

1 / 10
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे.
2 / 10
काही दिवसांपूर्वीच तमन्नाने अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याचं जाहीरपणे मान्य केलं. तेव्हापासून ती चर्चेत येत आहे.
3 / 10
सोशल मीडियावर तमन्नाची चर्चा रंगत असतानाच १८ वर्षांपूर्वी तिने केलेल्या नो किसिंग रुलची चर्चाही रंगली आहे.
4 / 10
तमन्नाने कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर ती कोणत्याही सिनेमात किसिंग सीन देणार नाही असा नियम तिने ठरवला होता.
5 / 10
जवळपास १८ वर्ष तमन्ना हा नियम फॉलो करत होती. मात्र, एका अभिनेत्याच्या प्रेमापोटी तिने हा रूल तोडला.
6 / 10
तमन्नाने तिच्या लस्ट स्टोरीज २मध्ये पहिल्यांदाच किसिंग सीन देत तिने स्वत: तयार केलेला रुल तोडला.
7 / 10
तमन्नाने या सीरिजमध्ये अभिनेता आणि तिचा प्रियकर विजय वर्मा याच्यासोबत लीप लॉक केलं आहे.
8 / 10
'मी आजवर कधीही इंटिमेट सीन दिले नाहीत तरीदेखील या भूमिकेसाठी सुजॉय घोष यांनी माझी निवड केली याचं मला खूप कौतुक आहे. पडद्यावर मला रोमान्स करताना प्रेक्षकांना नक्कीच संकोचल्यासारखं वाटलं असं मला वाटायचं. म्हणून मी किसिंग सीन न देण्याचा निर्णय घेतला होता', असं तमन्ना म्हणाली.
9 / 10
पुढे ती म्हणते, 'गेल्या काही वर्षात भारतीय प्रेक्षक वर्ग विचारांनी बराच प्रगल्भ झाला आहे. पण मी केवळ प्रसिद्धीसाठी नो किसिंग पॉलिसी तोडलेली नाही. मी १८ वर्षांपासून काम करतीये. या काळात माझे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आणि त्यासाठी मला कधी इंटिमेट सीनही द्यावे लागले नाहीत.'
10 / 10
दरम्यान, 'लस्ट स्टोरीज २'मध्ये केवळ कथेची गरज म्हणून मी ते सीन दिले, असंही तिने सांगितलं.
टॅग्स :तमन्ना भाटियासेलिब्रिटीबॉलिवूडटोलनाका