"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 22:47 IST
1 / 7अभिनेत्री विद्या बालनने इंडस्ट्रीमध्ये नुकतीच २० वर्षे पूर्ण केली. परिणीता या चित्रपटातून सैफ अली खान आणि संजय दत्तसारख्या दोन बड्या कलाकारांसोबत तिची सुरूवात झाली.2 / 7विद्या बालनने इंडस्ट्रीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. 'द डर्टी पिक्चर'मध्ये तिने बोल्डनेस दाखवून दिला आणि तिच्या वेगळ्या प्रकारच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले.3 / 7विद्या बालनने अलीकडेच इंटिमेट सीन्सबद्दल हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना सांगितले, 'एक अभिनेत्री म्हणून मी अजिबात असुरक्षित नाही. मी नेहमीच आशावादी असते.'4 / 7'माझा स्वतःवर खूप विश्वास आहे. मी माझ्या पूर्ण क्षमतेने काम करत असते. मी अशा अनेक लोकांना भेटते जे माझ्यात सुधारणा सुचवतात'5 / 7'वजन कमी करण्याचा सल्ला मला बरेचदा मिळालाय. पण मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि स्वत:लाच सांगितलं की माझ्यात काहीही चूक नाही.'6 / 7'सुरूवातीच्या काळात मी थोडी घाबरायचे. एकदा एक इंटिमेट सीन शूट करायचा होता. त्यावेळी अभिनेता चायनीज खाऊन आला होता आणि त्याने दातही घासले नव्हते'7 / 7'मी मनात म्हणाले की, हा जोडीदारासोबतही असाच वागतो का? पण मी त्याला काहीही बोलले नाही. मी खूप नवीन होते, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती,' असा किस्सा तिने सांगितला.