1 / 9क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट खूप चर्चेत राहिला. लग्नानंतर ४ वर्षातच त्यांचा संसार मोडला. घटस्फोटानंतर धनश्रीला बराच ट्रोलिंगचा सामना करावा लागला.2 / 9धनश्रीने युजवेंद्रकडून कोट्यवधींची पोटगी घेतली अशीही चर्चा झाली. तसंच घटस्फोटासाठी तिलाच लोकांनी जबाबदार धरलं. या सगळ्यावर आता धनश्री पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे.3 / 9धनश्रीने नुकतीच 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सविस्तर मुलाखत दिली. यावेळी ती घटस्फोटानंतरचं आयुष्य, ट्रोलिंग आणि प्रेमावर व्यक्त झाली. 4 / 9धनश्री म्हणाली, 'पहिल्या दिवसापासूनच माझ्यावर नकारात्मकतेचा आणि ट्रोलिंगचा काहीही परिणाम झाला नाही. कारण माझी इच्छाशक्ती जोरदार आहे. माझं सगळं लक्ष कामावर असतं कारण माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तुमचं काम बोललं पाहिजे अशीच माझी धारणा आहे. '5 / 9'ज्या गोष्टी माझ्या प्रगतीत येत असतील त्याकडे मी दुर्लक्ष करते. मी स्वत:समोर ध्येय ठेवते आणि जोपर्यंत मी ते ध्येय गाठत नाही तोवर त्याचा पाठपुरावा करत राहते.'6 / 9घटस्फोटानंतर आयुष्यात झालेल्या बदलांविषयी धनश्री म्हणाली, 'आता मी स्वत:कडे आणखी जास्त लक्ष देत आहे. मी आधीपासूनच मेहनती होते पण आता मी जीवनशैलीत बदल केला आहे. स्वत:वर प्रेम करणं, शिस्त, व्यायाम, चांगलं अन्न, आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत मी वेळ घालवत आहे. इतरांना प्रेरणा देईन असा मला माझा प्रवास घडवायचा आहे.'7 / 9'डान्स, अभिनय हे माझं पॅशन आहे. याच गोष्टी मला सकारात्मक ठेवतात. काही कठीण प्रसंग आले पण माझ्या याच पॅशनने मला कायम बळ दिलं. तसंही आव्हानांमधूनच माणूस शिकत असतो. या प्रवासातून माझी स्वत:शीच नव्याने ओळख झाली.'8 / 9मला आता फक्त कामावर लक्ष द्यायचं आहे. कधीकधी काही गोष्टींचं स्पष्टीकरण देत बसलो तर त्यातून आणखी गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे आता फक्त माझ्या कामाबद्दलच चर्चा व्हावी असं मला वाटतं.'9 / 9प्रेमाविषयी धनश्री म्हणाली, 'प्रेम हे आयुष्यात महत्वाचं आहेच यावर माझा आजही विश्वास आहे. प्रेमाची व्याख्या बदलत जाते. सध्या मी केवळ कामावर आणि स्वत:च्या प्रगतीकडे लक्ष देत आहे. भविष्यात जे घडेल त्यासाठी मी सज्ज आहेच पण सध्या करिअर आणि कुटुंब माझ्यासाठी प्राधान्य आहे.'