By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:34 IST
1 / 9दीपिका पादुकोण सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, एकीकडे तिच्यात आणि रणवीर सिंगमध्ये बिनसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे तिच्या तब्येतीच्या कुरबुरीही सुरू झाल्या आहेत. यामुळे दीपिकाचे चाहते जरा चिंतेत आहेत.2 / 9नुकतंच दीपिकाची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली होती. दीपिका वा तिच्या टीमने अद्याप याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. पण यामुळे दीपिकाचे चाहते अस्वस्थ झाले होते.3 / 9अशा निगेटीव्ह चर्चेदरम्यान दीपिका मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तिने हसत हसत कॅमेऱ्यांना पोझ दिल्या. अनेक फोटोत ती मास्क लावून दिसली.4 / 9एअरपोर्टवर दीपिका आईसोबत दिसली. यावेळी रणवीर तिच्यासोबत नव्हता. जीन्स आणि ब्लॅक व्हाईट टी-शर्ट अशा लुकमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसत होती.5 / 9दीपिकाचे एअरपोर्टवरचे हे फोटो व्हायरल झालेत आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा दीपिकाची चर्चा सुरू झाली. काही युजर्सनी दीपिकाच्या बोटात वेडिंग रिंग नसल्याचं नोटीस केलं.6 / 9दीपिकाची प्रकृती बरी नसताना रणवीर तिच्या सोबत नाही, ही गोष्टही अनेकांना खटकली. सध्या रणवीर व दीपिकात बिनसल्याच्या चर्चा आहेत. अर्थात रणवीरने या सगळ्या अफवा असल्याचं एका इव्हेंटमध्ये स्पष्ट केलं होतं.7 / 9दीपिकाची प्रकृती बिघडल्याने तिला मुंबईच्या रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी अलीकडे उमटली होती. रूग्णालयात दीपिकाच्या अनेक टेस्ट केल्या गेल्याचंही वृत्तात म्हटलं होतं.8 / 9काही महिन्यांआधीही दीपिकाची प्रकृती अशीच अचानक बिघडली होती. प्रभाससोबत एका चित्रपटाचं शूटींग सुरू असताना तिला अस्वस्थ वाटू लागल्यानं रूग्णालयात हलवण्यात आलं होतं.9 / 9दीपिकाला नेमकं काय झालंय, हे कळायला मार्ग नाही. कारण तिने वा तिच्या टीमने अद्याप यावर कुठलाही अधिकृत खुलासा केलेला नाही. पण एअरपोर्टवर दीपिकाचा हसरा फोटो पाहून अनेक चाहत्यांच्या जीवात जीव आला आहे, हे नक्की.