Join us

Chhaava Movie : 'छावा'मधली 'ती' सुंदरी कोण? अभिनयाबरोबरच होतेय सौंदर्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:05 IST

1 / 9
छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या छावा सिनेमाचा सर्वत्र बोलबाला असल्याचं पाहायाला मिळत आहे.
2 / 9
या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे.
3 / 9
छावामधील सर्वच कलाकारांचं कौतुक होत आहे. औरंगजेबाची भूमिका साकारून अक्षय खन्नाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
4 / 9
पण, औरंगजेबाच्या लेकीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
5 / 9
छावा सिनेमात शहजादी झिनतची भूमिका अभिनेत्री डायना पेंटी हिने साकारली आहे. डायनाने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होत आहे.
6 / 9
अभिनयाबरोबरच डायनाच्या सौंदर्यांने लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
7 / 9
डायन पेंटी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ३९ वर्षीय डायनाने 'कॉकटेल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
8 / 9
तिने 'परमाणू', 'धूम ३', 'हॅपी भाग जाएगी', 'सॅल्यूट', 'सेल्फी', 'ब्लडी डॅडी' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
9 / 9
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमात ती दिसली होती. आता छावा सिनेमामुळे ती चर्चेत आली आहे.
टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदाना