1 / 8मनोरंजन विश्वात महत्वाचा मानला जाणारा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' हा १३ मे पासून सुरू झाला आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातून मान्यवर उपस्थित असतात.2 / 8यंदाच्या हा ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव येत्या २४ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. उर्वशी रौतेला, जॅकलीन फर्नांडिस, नितांशी गोयलसह तसेच मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी देखील कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. 3 / 8दरम्यान, या महोत्सवात एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या डेब्यूची चांगलीच चर्चा होताना दिसते आहे. ही अभिनेत्री म्हणजे नितांशी गोयल.4 / 8किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटानंतर अभिनेत्री नितांशी गोयल प्रसिद्धीझोतात आली. चित्रपटातील तिच्या कामाची सर्व स्तरावर दखल घेण्यात आली. 5 / 8त्यात आता नितांशीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू आहे. त्यामुळे जगभरात तिची चर्चा होत आहे. 6 / 8वयाच्या १७ व्या वर्षी रेड कार्पेटवर झळकणारी ती सर्वात कमी वयाची अभिनेत्री ठरली. कान्समध्ये तिने केलेल्या लूकची सर्वानाच भूरळ पडली आहे. 7 / 8कान्समधील नितांशीच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन पिरधान केला होता. त्यावर साजेसा खड्यांचा नेकलेस घालून तिने लूक पूर्ण केला. 8 / 8'जागतिक व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण...', असं कॅप्शन देत नितांशीने कान्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.