Join us

IN PICS : मुन्नाभाई ते दबंग...साऊथने कॉपी केलेत बॉलिवूडचे ‘हे’ सुपरहिट चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 18:41 IST

1 / 11
2003 साली आलेला मुन्नाभाई-एमबीबीएस हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या बॉलिवूड चित्रपटाचे तीन वेगवेगळ्या भाषेत रिमेक बनले. तामिळमध्ये वसूल राजा एमबीबीएस, तेलगूत शंकर दादा एमबीबीएस, कन्नडमध्ये Uppi Dada MBBS या नावानं रिमेक बनवले गेले.
2 / 11
ओएमजी हा अक्षय कुमार व परेश रावल यांचा सुपरहिट हिंदी सिनेमा. साऊथने याचा रिमेक बनवला. गोपाला गोपाला या नावाच्या या रिमेकमध्ये पवन कल्याण व व्यंकटेश लीड रोजमध्ये होते.
3 / 11
थ्री इडिट्स हा आमिर खानचा सिनेमा किती गाजला, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. साऊथवाल्यांनी हा सिनेमा लगेच उचलला.Nanban या नावाने या चित्रपटाचा तामिळ रिमेक बनला.
4 / 11
नसीरूद्दीन शाह व अनुपम खेर यांचा ‘अ वेन्सडे’ या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. साऊथमध्ये Unnaipol Oruvan या नावानं याचा रिमेक बनवला गेला.
5 / 11
सलमान खानचा सुपरडुपर हिट सिनेमा ‘दबंग’ तुफान गाजला. तेलगूत हा सिनेमा ‘गब्बर’ नावानं रिलीज झाला. या चित्रपटातही पवन कल्याण लीड रोलमध्ये दिसला.
6 / 11
‘लगे रहो मुन्नाभाई’ याचा रिमेकही साऊथमध्ये बनवला गेला़ तेलगूत ‘शंकर दादा जिंदाबाद’ या नावानं हा सिनेमा रिलीज झाला. प्रभुदेवानं दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात चिरंजीवी लीड रोलमध्ये दिसला.
7 / 11
अमिताभ बच्चन व तापसी पन्नूचा ‘पिंक’ हा चित्रपट सुपरहिट ठरला़ तामिळमध्ये Nerkonda Paarvai नावानं याचा रिमेक बनला.
8 / 11
आयुष्यमान खुराणा व तब्बूचा ‘अंधाधुन’ या चित्रपटानंही साऊथला भुरळ घातली. तेलगूत Maestro या नावानं याचा रिमेक बनला तर मल्याळममध्ये Bhramam या नावानं हा सिनेमा बनवला गेला.
9 / 11
शाहिद कपूर व करिनाचा ‘जब वुई मेट’ हा सिनेमा तामिळमध्ये Kanden Kadhalai या नावानं बनवला गेला.
10 / 11
‘लव्ह आज कल’ हा बॉलिवूड सिनेमा तेलगूत Teen Maar या नावानं बनवला गेला.
11 / 11
‘प्यार का पंचनामा’ या सिनेमाचाही साऊथमध्ये रिमेक बनला. Green Signal या नावानं हा रिमेक बनवला गेला.
टॅग्स :बॉलिवूडTollywood