Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 07:00 IST

1 / 9
कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याच कुटुंबियांसोबत चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये आपल्या रिअल लाइफ सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात.
2 / 9
ऐश्वर्या राय- अमिताभ बच्चन - बॉलिवूडचं ऐश्वर्य म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून आहे. ऐश्वर्याने सासरे अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात क्यों हो गया ना, मोहब्बते, खाकी, सरकार राज, हम किसी से कम नहीं यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहेत.
3 / 9
विशेष म्हणजे 'बंटी और बबली' या चित्रपटातील कजरा रे या गाण्यात बिग बींनी ऐश्वर्यासोबत फ्लर्टही केल्याचं पाहायला मिळालं.
4 / 9
नीतू कपूर-शशी कपूर - नीतू कपूर आणि शशी कपूर या सून आणि सासरे जोडीने अनेक चित्रपटांमध्ये रोमॅण्टिक सीन दिले आहेत. शशी कपूर हे नीतू कपूर यांचे चुलत सासरे आहेत.
5 / 9
या दोघांचं 'कह दूं तुम्हें' हे रोमॅण्टिक गाणं प्रचंड गाजलं होतं. तसंच त्यांनी 'एक और एक ग्यारह', 'काला पानी' आणि 'दिवारी' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
6 / 9
समंथा रुथ प्रभू-नागार्जुन - समंथा रुथ प्रभू आणि नागार्जुन यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यात 'राजू गरी गाढी 2, दयालु, मनम या चित्रपटांचा समावेश आहे.
7 / 9
समंथाने २०१७ मध्ये नागार्जुनच्या मुलासोबत नागा चैतन्यसोबत लग्न केलं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
8 / 9
आलिया भट्ट- ऋषी कपूर - काही दिवसांपूर्वीच आलियाने अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न गाठ बांधली. मात्र, या लग्नापूर्वी आलियाने रणबीरचे वडील दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं आहे.
9 / 9
'स्टुडंट ऑफ द इयर' आणि 'कपूर अँड सन्स'मध्ये या दोघांनी एकत्र काम केलं आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाआलिया भटऋषी कपूरनितू सिंगऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चन