निळ्या डेनिम ड्रेसमध्ये तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस लूक; हटके पोज देत क्लिक केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:43 IST
1 / 9अभिनेत्री तमन्ना भाटिया अलिकडेच 'सिकंदर का मुक्कदर' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली होती.2 / 9बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या तमन्नाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 3 / 9अभिनेत्रीने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. 4 / 9'स्त्री २' या चित्रपटामधील 'आज की रात' या गाण्यामुळे तिच्याविषयी मनोरंजनविश्वात चर्चा रंगली होती.5 / 9तसेच 'बाहुबली' सिनेमातील तिने साकारलेली भूमिकाही चाहत्यांच्या स्मरणात आहे. 6 / 9अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या फॅशनसेन्समुळे कायमच चर्चेत येत असते. 7 / 9तिचं हटके फोटोशूट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं. 8 / 9दरम्यान, नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.9 / 9निळ्या रंगाचा डेनिम ड्रेस तसेच त्यावर साजेसा खड्यांचा नेकलेस असा सुंदर लूक तिने केला आहे.