Join us
Daily Top 2Weekly Top 5

१२० कोटींच्या संपत्तीची मालकीण! सौंदर्यात आघाडीच्या नायिकांना देते टक्कर, एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ मानधन, ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:48 IST

1 / 7
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची जागा मिळविणे तसे कठीण आहे. अशीच जागा मिळविणाऱ्या आताच्या काळातील अभिनेत्रींमध्ये नाव घ्यावे लागेल ते म्हणजे तमन्ना भाटिया.
2 / 7
तमन्ना भाटियाचा जन्म २१ डिसेंबर १९८९ ला मुंबई येथे झाला.आज या नायिकेचा वाढदिवस आहे.तमन्ना भाटिया तिच्या नवनवीन चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.
3 / 7
तमन्ना भाटियाने २००६ मध्ये'श्री' या तेलुगू चित्रपटाद्वारे दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याच वर्षी तिचा 'केडी'हा तमिळ चित्रपटातही प्रदर्शित झाला आणि तिची गाडी सुसाट गेली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. सध्याच्या घडीला ती साऊथ इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.
4 / 7
करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी काही छोट्या भूमिका केल्या,त्यानंतर अथक परिश्रमानंतर तिने केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली.
5 / 7
'हंसी तो फंसी', 'बाहुबली' यांसारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं. आपल्या दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने तिने चाहत्यांना भूरळ घातली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तमन्नाहची संगीत क्षेत्रातही तितकीच सक्रिय आहे.
6 / 7
आपल्या नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाणारी तमन्ना 'आज की रात', 'नशा', 'ताकी तकी' आणि 'पिया के बाजार' यांसारख्या आयटम सॉंग्समुळेही तितकीच चर्चेत राहिली.
7 / 7
मिडिया रिपोर्टनुसार, तमन्ना भाटिया १२० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. ती एका चित्रपटासाठी ४-५ कोटी रुपये मानधन घेते.ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली २' साठी मानधन म्हणून ५ कोटी रुपये घेतले.
टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूडसेलिब्रिटी