मुस्लिम असूनही संतोषी मातेचं १६ शुक्रवारचं व्रत ठेवते ही बॉलिवूड अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 18:18 IST
1 / 7एक अशी बॉलिवूड अभिनेत्री जी धर्माने मुस्लिम असली तरीही तिने संतोषी मातेचे १६ शुक्रवार पाळले असून व्रत केलंय. या बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव आहे नुसरत भरुचा2 / 7नुसरत भरुचा सध्या 'छोरी २' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नुसरतने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला. लहानपणापासून ती चर्च, गुरुद्वारा आणि मंदिरात जात आहे3 / 7नुसरतने संतोषी मातेचे १६ शुक्रवारचे व्रतही पाळले आहेत. याशिवाय केदारनाथ, बद्रिनाथ यांसारख्या धार्मिक स्थळांना तिने भेट दिली आहे.4 / 7मनाची शांती, समाधान आणि देवाचा आशीर्वाद मिळण्याचा विलक्षण अनुभव नुसरतला या ठिकाणी आला. याशिवाय १३ किमी. पायी प्रवास करुन नुसरत वैष्णोदेवी मातेच्या मंदिरातही गेली होती5 / 7निव्वळ श्रद्धा आणि आस्था या दोन भावना मनात ठेऊन नुसरत या मंदिरांना आणि धार्मिक स्थळांना जमेल तशी भेट देत असते6 / 7मुस्लिम असूनही देवीचं व्रत पाळते म्हणून नुसरतला लोकानी ट्रोलही केलं. परंतु मला कोण काय बोलतंय याचा काही फरक पडत नाही, असं अभिनेत्री म्हणाली7 / 7सध्या नुसरतची प्रमुख भूमिका असलेला छोरी २ सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर रिलीज झालाय.