1 / 7'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिट्टू की स्वीटी' यांसारख्या चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुचाला ओळखलं जातं.2 / 7आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत: चं एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 3 / 7सध्या नुसरत 'छोरी-२' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, अलिकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 4 / 7दरम्यान, 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातील सीनसाठी तब्बल तीन दिवस बिकनी घातली होती. यामागे काय कारण होतं? याचा खुलासा तिने अलिकडेच केला .5 / 7अलिकडेच मीडियासोबत संवाद साधताना नुसरत म्हणाली, 'त्या सीनपूर्वी मी दिग्दर्शक लव सर यांना सांगितले होते की मी या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नाही. जर मला जबरदस्ती बिकनी घालायला लावली तर ते कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसेल.' 6 / 7तो सीन पडद्यावर उत्तम साकारण्यासाठी मी परदेश दौऱ्यावर गेली. त्या टूरवर एकटीच गेली होती. त्या ट्रिपमध्ये, तिने तीन दिवस फक्त बिकिनी घातली होती जेणेकरून तिचे स्वतःचे विचार देखील बदलता येतील. असंही तिने म्हटलं.7 / 7यानंतर अभिनेत्रीने सांगितलं की, 'पहिला दिवस माझ्यासाठी थोडा विचित्र होता. पण दुसऱ्या दिवशी मला कळलं सुद्धा नाही की मी बिकिनी घातली आहे. माझ्यासाठी सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या.'