Join us

IN PICS : कतरिनाला सासरी मिळालं फुल्ल ‘पंजाबी फ्लेवर’चं नवं नाव, ‘या’ नावाने हाक मारतात सासूबाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 17:58 IST

1 / 8
कतरिना कैफ बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. आता नवा नवा संसार म्हटल्यावर कतरिनाच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असणारच.
2 / 8
आता कतरिनाने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. होय, ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली. यावेळी तिने अनेक खुलासे केलेत.
3 / 8
सासरी कोणत्या नावाने हाक मारतात, याचा खुलासाही तिने केला. सासूबाई तुला कोणत्या नावाने हाक मारतात, असा प्रश्न कपिलने केला. यावर, मला सासरी एक नवीन नाव मिळालं आहे, असं तिने सांगितलं.
4 / 8
आता हे नवीन नाव काय? तर किट्टो. होय, सासरची मंडळी तिला कतरिना किंवा कॅट या नावाने नव्हे तर किट्टो या नावाने हाक मारतात.
5 / 8
विकीचं कुटुंब पंजाबी आहे आणि किट्टो या नावाला खास पंजाबी फ्लेवर आला आहे, त्यामुळे सगळेच तिला याच नावाने हाक मारू लागले आहेत. विकी मात्र अनेकदा तिला ‘पॅनिक बटण’ नावाने बोलवतो. अर्थात मस्करीत. कारण कतरिना छोट्या छोट्या गोष्टींमुळे पॅनिक होते.
6 / 8
यावेळी कतरिनाने एक बेडरूम सीक्रेटही उघड केलं. ‘मला चांगली झोप लागावी म्हणून विकी कौशल माझी विशेष काळजी घेतो. विकी चांगला गातो. कधी कधी मला झोप येत नाही, तेव्हा मी त्याला माझ्यासाठी गाणं गायला सांगते. तो मला गाणं गाऊन झोपवतो, असं कतरिना म्हणाली.
7 / 8
कतरिनाने विकीच्या वाईट सवयींबद्दलही सांगितलं. विकी कधी कधी खूप हट्ट करतो. त्याचा हा हट्टी स्वभाव वाईट असल्याचं ती म्हणाली.
8 / 8
कतरिनाच्या ‘फोनभूत’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. यात ती सिध्दांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूड