अभिनेत्रीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न ठरलं, पत्रिकाही छापल्या, पण आईचं निधन झालं अन् घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:03 IST
1 / 7बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिचं लग्न ठरलं होतं. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. पण अचानक अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं. आणि अभिनेत्रीने एक मोठा निर्णय घेतला2 / 7ही अभिनेत्री म्हणजे जुही चावला. जुहीने खऱ्या आयुष्यात जय मेहतासोबत लग्न केलं. जुही आणि जयची लव्हस्टोरी एकदम खास होती. 3 / 7जुही आणि जयची भेट एका डिनर पार्टी दरम्यान झाली होती. जूही त्यावेळी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. दोघांमध्ये बोलणं सुरु झालं.4 / 7जुही आणि जयच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये इतकं प्रेम होतं की जय तिला ट्रक भरुन गुलाब पाठवायचा असं सांगितलं जातं.5 / 7नात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जुही आणि जयने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. भव्य पद्धतीने जय-जुही एकमेकांशी लग्न करणार होते. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या.6 / 7पण लग्नाच्या काही दिवस आधी जुहीच्या आईचं निधन झालं. जुहीच्या कुटुंबावर शोककळा पसरली. या काळात जुहीला लग्न साधेपणाने करायचं होतं. 7 / 7जय मेहता आणि त्याच्या कुटुंंबाने जुहीच्या मनाचा विचार केला आणि तिच्या म्हणण्याचा मान राखला. त्यामुळेच जुही-जयचं लग्न साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालं