कुठे हरवली बॉबी देओलची 'करीब'फेम अभिनेत्री? मनोज बाजपेयीशी लग्न केल्यानंतर झाली बॉलिवूडपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:37 IST
1 / 7बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेला करीब हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. १९९८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.2 / 7या चित्रपटात बॉबी देओलसोबत आणखी एक भूमिका गाजली ती म्हणजे अभिनेत्री नेहा हिची. चेहऱ्यावरील निष्पाप भाव आणि साधेपणा यामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.3 / 7या चित्रपटातून नेहा लोकप्रिय झाली. मात्र, त्यानंतर ती फार मोजक्या चित्रपटांमध्ये झळकली. त्यामुळे सध्या ती काय करते असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.4 / 7नेहाने अभिनेता मनोज बाजपेयीसोबत लग्नगाठ बांधली आहे. करीबच्या सेटवरच या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर या भेटीचं प्रेमात व नंतर लग्नात रुपांतर झालं.5 / 7लग्नानंतर नेहाचा कलाविश्वातील वावर कमी झाला असून आता ती तिचा सगळा वेळ कुटुंबासाठी देते.6 / 7नेहाच्या लूकमध्येही कमालीचा बदल झाला आहे. लांबसडक केस असलेल्या नेहाने तिचा हेअर कट चेंज केला आहे. त्यामुळे तिला ओळखणंही कठीण आहे.7 / 7नेहाचं खरं नाव शबाना असं असून कलाविश्वात येण्यापूर्वी तिने नाव चेंज केलं. नेहाने फिजा, होगी प्यार की जीत, कोई मेरे दिल में हैं या सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.