Join us  

‘83’, ‘लालसिंग चड्ढा’, ‘भेडिया’...! चाहत्यांना आहे या सिनेमांची प्रतीक्षा, मोठी आहे यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 8:00 AM

1 / 9
‘भेडिया’ हा वरूण धवन व क्रिती सॅननचा हॉरर कॉमेडी सिनेमा 25 नोव्हेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘स्त्री’ फेम दिग्दशर््क अमर कौशिक या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
2 / 9
रोहित शेट्टी रणवीर सिंगसोबत नवा सिनेमा घेऊन येतोय. चित्रपटाचं नाव आहे, ‘सर्कस’. 15 जुलै 2022 रोजी रिलीज होणाºया या चित्रपटात रणवीरसोबत पूजा हेगडे व जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत.
3 / 9
‘लालसिंग चड्ढा’ हा आमिर खानचा बहुप्रतिक्षीत सिनेमाही प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नव्या वर्षात 14 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
4 / 9
‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा आहे. आलिया भट व रणबीर कपूरच्या या चित्रपटाच्या रिलीजसाठी 9 सप्टेंबर 2022 ही तारीख बुक करण्यात आली आहे.
5 / 9
रणवीर सिंग व दीपिका पादुकोणचा ‘83’ हा स्पोर्ट्स ड्रामा 24 डिसेंबर 2021 रोजी तुमच्या भेटीस येतोय. कबीर खान या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे
6 / 9
सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा हा अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमा 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होतोय. करण जोहर हा सिनेमा प्रोड्यूस करतोय.
7 / 9
आलिया भटचा ‘गंगूबाई काछियावाडी’ या सिनेमासाठी 18 फेब्रुवारी 2022 ही रिलीज डेट बुक करण्यात आली आहे. संजय लीला भन्साळींचा हा सिनेमा पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.
8 / 9
कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, इशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा 15 जुलै 2022 रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.
9 / 9
सोनू की टीटू की स्वीटी, प्यार का पंचनामा असे सुपरहिट सिनेमे देणारे लव रंजन नवा सिनेमा घेऊन येत आहेत. यात श्रद्धा कपूर व रणबीर कपूर लीड रोलमध्ये दिसणार आहेत. 26 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं कळतंय.
टॅग्स :बॉलिवूडसिनेमा