Join us

वयानं मोठी आहे आर्यन खानची गर्लफ्रेंड, दोघांमध्ये किती वर्षांचं अतंर? जाणून घ्या तिच्याबद्दल सर्व काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:35 IST

1 / 11
Aryan Khan: बॉलिवूडचा किंग खान असलेल्या शाहरुखचा मुलगा आर्यन खान याने नुकतंच सिनेसृष्टीत पदार्पण केलंय. त्याने दिग्दर्शित केलेली सीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' आज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलीये.
2 / 11
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रिमिअरला आर्यन खानची गर्लफ्रेंड लारिसा बोनेसी (Larissa Bonesi) उपस्थित होती. लारिसा बोनेसी ही एक ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
3 / 11
IMDbनुसार लारिसा बोनेसीचा जन्म २८ मार्च १९९४ रोजी झाला असून ती आर्यन खानपेक्षा वयाने मोठी आहे.
4 / 11
आर्यन खानचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी झाला, तर लारिसाचा जन्म २८ मार्च १९९४ रोजी झाला. याचा अर्थ दोघांमध्ये ३ वर्षे ७ महिने १५ दिवसांचं अतंर आहे.
5 / 11
लारिसाने वयाच्या १३ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. चीन, हाँगकाँग आणि थायलंडसारख्या देशांमध्ये मॉडेलिंग केल्यानंतर २०११ मध्ये ती मुंबईत स्थायिक झाली.
6 / 11
'देसी बॉईज' या चित्रपटातील 'सुबा होने ना दे' या गाण्यात डान्सर म्हणून ती पहिल्यांदा दिसली होती. त्यानंतर तिने 'गो गोवा गॉन'सह 'थिका' व 'नेक्स्ट एंटी?' यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले.
7 / 11
तसेच ती नेटफ्लिक्सवरील 'पेंटहाऊस' आणि 'घाटी' या चित्रपटांमध्येही दिसली आहे. पण, लारिसाने अद्याप बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका साकारलेली नाही.
8 / 11
चित्रपटांव्यतिरिक्त, लारिसाने अनेक लोकप्रिय संगीत व्हिडीओंमध्येही काम केले आहे. यात बेनी दयालच्या 'आर यू कमिंग', विशाल मिश्राच्या 'आओ ना' आणि यो यो हनी सिंगसोबतच्या 'सुपरस्टार' या गाण्यांचा समावेश आहे.
9 / 11
३१ वर्षीय लारिसाचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असून ती फिटनेस आणि फॅशनच्या बाबतीतही खूप सक्रिय आहे. तिनं अनेक ब्रँड्स व जाहिरातीसाठी काम केलंय.
10 / 11
आर्यनसोबतच लारिसा शाहरुख खान, सुहाना खान आणि किंग खानची मॅनेजर पूजा ददलानी यांना देखील फॉलो करते. तर आर्यन खानदेखील तिच्या संपूर्ण फॅमिलीला इन्स्टाग्रावर फॉलो करतो.
11 / 11
लॅरिसा ही २०१९ मध्ये सूरज पांचोलीला डेट करत असल्याची चर्चा होती. ते दोघे जिममध्ये भेटले होते आणि तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र होते.
टॅग्स :आर्यन खानशाहरुख खानबॉलिवूडसुरज पांचोली