By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:30 IST
1 / 8मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे एकेकाळी बी-टाउनमधील सर्वात लोकप्रिय कपल होतं. त्यांची केमिस्ट्री अनेकांना प्रचंड आवडायची. 2 / 8जेव्हा अर्जुन कपूरने मलायकासोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली तेव्हा अनेक चाहते दु:खी झाले. मात्र ब्रेकअपनंतर मलायका आणि अर्जुन पुन्हा प्रेमात पडल्याची बातमी समोर आली आहे.3 / 8कॉमेडियन आणि अभिनेता हर्ष गुजरालने मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर खरोखरच आयुष्यात पुढे गेला आहे की तो अजूनही सिंगल आहे? याबाबत सांगितलं आहे.4 / 8'मेरे हसबंड की बीवी' या आगामी चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत, चित्रपटातील कलाकारांनी लव्ह ट्रँगल आणि रिलेशनशिपबद्दल चर्चा केली.5 / 8अर्जुन कपूरच्या लव्ह लाईफवर हर्ष म्हणाला - अर्जुन भाई खऱ्या आयुष्यातही सिंगल आहे. आम्ही हे चित्रपटासाठी करत आहोत.6 / 8हर्ष गुजरालच्या विधानामुळे अर्जुन कपूर सध्या कोणालाही डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तो त्याच्या सिंगल आयुष्यात आनंदी आहे.7 / 8'मेरे हसबंड की बीवी'यात हर्ष गुजराल आणि अर्जुन कपूर यांच्यासोबत भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २१ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.8 / 8