By देवेंद्र जाधव | Updated: March 11, 2026 15:52 IST
1 / 7'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्ना चांगलाच चर्चेत आला. अक्षय खन्नाने 'धुरंधर' सिनेमात साकारलेली रहमान डकैतची भूमिका चांगलीच गाजली.2 / 7५० वर्षीय अक्षय खन्नाचा फिटनेस आजही सर्वांना थक्क करणारा आहे. अक्षय खन्नाचं फिटनेस रुटिन अजब आहे. जे वाचून तुम्हीही चकीत व्हाल.3 / 7असं सांगतात की, फिट राहण्यासाठी आणि एनर्जी मिळवण्यासाठी नाश्ता करणं गरजेचं आहे. पण अक्षय खन्ना सकाळी अजिबात नाश्ता करत नाही.4 / 7अक्षय खन्ना सकाळी नाश्ता न करता थेट दुपारी जेवतो. त्यामुळे जेवणाआधी तो पोट रिकामं ठेवतो. दुपारी जेऊन अक्षय खन्ना संध्याकाळी चहा घेतो.5 / 7यानंतर अक्षय खन्ना थेट रात्री जेवतो. अशाप्रकारे दिवसातून दोनच वेळा अक्षय खन्ना पूर्ण जेवण जेवतो जेवणाच्या मध्ये चहा सोडल्यास तो बाकी काही खात नाही. यामुळे शरीर हलकंफुलकं राहण्यास मदत होते असं तो सांगतो.6 / 7दुपारी अक्षय खन्ना वरण-भात, एखादी भाजी आणि सोबतीला चिकन किंवा मासे असे पदार्थ खातो. रात्री तो भात खाणं टाळतो. डिनरमध्ये चपाती-भाजी किंवा एखादा चिकनचा पदार्थ अक्षय खातो.7 / 7जेवण मर्यादित असलं तरीही अक्षय आरामाला विशेष महत्व देतो. १० तासांची पुरेशी झोप घेऊन अक्षय आराम करण्यासही प्राधान्य देतो.