सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या नायिका होतील फेल! कोण आहे 'ही' सिमर भाटिया, 'इक्कीस' मधून करतेय पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:31 IST
1 / 7 बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मुलांनी एन्ट्री घेणं हे काही नवं नाही. 2 / 7 जान्हवी कपूर, शनाया कपूर तसेच आर्यन खान आणि इब्राहिम अली खान अशा अनेक स्टारकिड्सनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.3 / 7 अशाच एका अभिनेत्रीबद्दल इंडस्ट्रीत चर्चा सुरु आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित इक्कीस हा सिनेमा येत्या4 / 7 इक्कीस सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे.तर त्याच्यासोबत एक फ्रेश चेहरा चित्रपटात दिसणार आहे.5 / 7 या चित्रपटात सिमर भाटिया ही अभिनेत्री त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे नाव किरण आहे. सिमरचा चित्रपटातील लूक खूप आकर्षक दिसत आहे.6 / 7 सिमर भाटिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला. त्यामधील अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली आहे. 7 / 7 सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारी ही नवी नायिका अभिनेता अक्षय कुमारची भाची आहे. अक्षयची बहीण अलका भाटिया यांची ती मुलगी आहे.