Join us
Daily Top 2Weekly Top 5

"साडी चुरगळू नये म्हणून ऐश्वर्या राय तब्बल ६ तास..."; प्रसिद्ध डिझायनरचा मोठा खुलासा, चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:55 IST

1 / 7
चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चनच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा नेहमीच असते. अभिनेत्रीचं कामाप्रती किती समर्पण आहे, हे एका उदाहरणावरुन नुकतंच चाहत्यांना दिसून आलं.
2 / 7
ऐश्वर्याच्या 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक थक्क करणारा किस्सा आता समोर आला आहे. चित्रपटाच्या दागिन्यांचे डिझायनर किशन दास यांनी एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे.
3 / 7
ऐश्वर्याने चित्रपटात 'नंदिनी'ची भूमिका साकारली होती. नंदिनी चित्रपटात भरभक्कम दागिने आणि भरजरी पोशाख परिधान करते. हा पोशाख वजनाने खूप जड होता.
4 / 7
एकदा पोशाख परिधान केल्यानंतर साडी चुरगळू नये आणि दागिन्यांची मांडणी बिघडू नये, म्हणून ऐश्वर्या शूटिंगच्या दरम्यान सलग ६-७ तास खुर्चीवर बसायची नाही. तिने तासनतास उभं राहून शॉटची वाट पाहणे पसंत केले, जेणेकरून तिचा लूक पडद्यावर बिघडलेला दिसणार नाही.
5 / 7
'पोन्नियिन सेल्वन' हा एक ऐतिहासिक चित्रपट असल्याने त्यातील प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे होते. ऐश्वर्याने घातलेले सोन्याचे आणि मौल्यवान खड्यांचे दागिने हे त्या काळातील राजेशाही थाट दर्शवणारे होते, आणि ते सांभाळणे हे एक मोठे आव्हान होते.
6 / 7
त्यामुळेच ऐश्वर्याने साडी आणि दागिन्यांची मूळ बांधणी बिघडू नये म्हणून काहीसा त्रास होत असतानाही खुर्चीवर न बसता तासन् तास उभं राहणं पसंत केलं. ऐश्वर्याचं तिच्या कामाबद्दल किती प्रेम आहे हेच यातून दिसून आलं.
7 / 7
ऐश्वर्या रायच्या या वागण्याने सेटवरील सर्वच तंत्रज्ञ आणि कलाकार भारावून गेले होते. किशन दास यांच्या मते, ऐश्वर्यासारख्या मोठ्या स्टारने कामाबद्दल दाखवलेली ही निष्ठा वाखाणण्याजोगी होती.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार