मूल होत नाही म्हणून झाला होता घटस्फोट, सलमानच्या 'या' अभिनेत्रीने पन्नाशीत दिला मुलीला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:48 IST
1 / 9एक काळ होता जेव्हा अभिनेत्री रेवती (Revathy) आणि सिनेमॅटोग्राफर सुरेशचंद्र मेनन (Suresh Chandra Menon) यांना फिल्मी इंडस्ट्रीतील लकी कपल म्हटले जायचे. दोघंही अगदी कमी वयात एकमेकांच्या प्रेमात पडले.2 / 9रेवती 'प्रेमा पासम' या फिल्ममध्ये काम करत होती तेव्हा तिची ओळख दिग्दर्शक सुरेश चंद्र मेनन यांच्यासोबत झाली. आधी मैत्री आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांही एकमेकांच्या प्रेमात अक्षरश: बुडाले होते.3 / 91986 साली रेवती आणि सुकेशचंद्र मेनन यांनी लग्नगाठ बांधली. हे लग्न त्याकाळी चर्चेचा विषय ठरलं होतं. मात्र काही वर्षांनी दोघांमध्ये काहीतरी बिनसलं. त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. अनेक प्रयत्नांनंतरही रेवतीला मूल होऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात भांडणं व्हायला सुरुवात झाली होती. दुर्दैवाने हा तणाव वाढतच गेला.4 / 91993 मध्ये रेवती आणि सुरेश हिट फिल्म 'पुथिया मुखम' मध्ये दिसले. ही त्यांची शेवटची फिल्म होती. सुरेश यांनीच सिनेमा दिग्दर्शित केला होता. या फिल्मला केवळ चाहतेच नाही तर समीक्षकांनीही प्रेम दिले. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाईही केली. 5 / 9जेव्हा दोघांमधील तणाव थांबण्याचं नावच घेत नाही बघता हे नातं संपत चाललंय हे त्यांना दिसत होतं. हे कपल आयडियल कपल म्हणून ओळखले जायचे. मात्र 2002 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. तेव्हापासून ते वेगळे राहू लागले.6 / 9दोघांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. १० वर्षांपासून दोघंही वेगवेगळे राहत आहेत हे बघून चेन्नई फॅमिली कोर्टाने 22 एप्रिल 2013 रोजी घटस्फोटाला मंजुरी दिली.7 / 9घटस्फोटानंतर वयाच्या ४८ व्या वर्षी रेवतीने IVF च्या माध्यमातून मुलीला जन्म दिला. तिचे नाव 'माही' असं ठेवण्यात आलं. काही वर्ष गायब होते कारण म्हणजे माझी मुलगी माही जी माझं आयुष्य आहे आणि जिने माझं आयुष्य बदललं आहे. माझ्या जीवनात तिच्यामुळे आनंदाचे क्षण आले आहेत. तुम्हा सर्व चाहत्यांसाठी ते क्षण शेअर करत आहे, असं म्हणत तिने लेकीचा फोटो दाखवला होता.8 / 9रेवतीच्या या निर्णयाने अनेकांनी तिचे अभिनंदन केले तर काही जणांनी प्रश्नही उपस्थित केले. ती पोस्ट केल्यानंतर ५ वर्षांनी रेवतीने सांगितले की,'मला घटस्फोटानंतर नेहमीच एक मूल हवं होतं आणि मी आयव्हीएफच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला.'9 / 9सध्या रेवती आणि सुकेश दोघेही करिअरमध्ये व्यस्त आहेत. दोघांच्या कलेला समीक्षक पसंत करत आहेत. मात्र मनोरंजन विश्वातून एक आयडियल कपल विभक्त झाल्याने तेव्हा अनेकांना धक्का बसला हे नक्की.