By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:32 IST
1 / 7एरवी अभिनेत्री बोल्ड आणि हॉट फोटोशूट सर्वांचं लक्ष वेधून घेतात. पण एका अभिनेत्रीने अत्यंत सुंदर पारंपरिक फोटोशूट करुन सर्वांचं मन जिंकलंय.2 / 7ही अभिनेत्री आहे पूजा हेगडे. नुकतेच पूजाने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत पूजा कमालीची सुंदर दिसतेय.3 / 7कोणताही भडक मेकअप किंवा जड दागिने न वापरता पूजाने आपला लूक अत्यंत साधा पण सुंदर ठेवला आहे. तिची ही स्टाईल चाहत्यांना भावली आहे. 4 / 7पूजाने खास साऊथ इंडियन स्टाईलची पांढऱ्या आणि लाल रंगाचं मिश्रण असलेली साडी नेसली आहे. पूजाने केसात गजराही माळलेला दिसतोय. पूजा या लूकमध्ये खूप सुंदर दिसतेय.5 / 7पूजाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 'नैसर्गिक सौंदर्य कशाला म्हणतात, हे पूजाकडे पाहून समजते,' अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.6 / 7पूजा हेगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती २०२५ मध्ये रिलीज झालेल्या कुली सिनेमातील मोनिका गाण्यामुळे चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. पूजाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही अपडेट नाही.7 / 7पूजाने केलेलं हे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर ट्रेंडिंग असून, 'स्टाईल आयकॉन' म्हणून तिने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे.