Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीचा सर्वोच्च न्यायालयातच झालेला विनयभंग, वरिष्ठ वकिलाने काढलेली छेड; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:02 IST

1 / 8
'छोटी सरदारनी' या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री निम्रत कौर अहलूवालियाने (Nimrat Kaur Ahluwalia) नुकताच धक्कादायक खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातच तिचा विनयभंग झाला होता असं तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.
2 / 8
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक अनुभव सांगताना ती म्हणाली, 'मी १९ वर्षांची होते. मी लॉ कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. सर्वोच्च न्यायालयात मी सुनावणी पाहण्यासाठी गेले होते.'
3 / 8
'मी कोर्टरुममध्ये होते, सुनावणी सुरु होती, अनेक लोक हजर होते. अशा भर गर्दीत, तेही सर्वोच्च न्यायालयात एका वरिष्ठ वकिलाने माझा विनयभंग केला.'
4 / 8
'त्या वरिष्ठ वकिलाकडे हातात फाईल्स होत्या. तो कायदेशीर वकील होता. मी तिथेच उभी होते आणि सुनावणी पाहत होते. तेवढ्यात मला जाणवलं की कोणीतरी माझ्या मागच्या शरिराला हात लावत आहे. आधी वाटलं की गर्दी आहे तर हात लागला असेल. पण मी मागे वळून बघितलं तो वकील सरळ दिशेने बघत होता. तो माझ्याकडे बघत नव्हता.'
5 / 8
'मग मी माझी जागा बदलली आणि दुसरीकडे जाऊन उभी राहिले. परत अचानक कोणीतरी माझ्या हाताला स्पर्श करत असल्याचं जाणवलं. मी बघितलं तर तो तोच व्यक्ती होता. मी दुर्लक्ष केलं तर तो पु्न्हा माझ्या शरिराच्या मागच्या भागाला स्पर्श करत होता.'
6 / 8
'मला धक्काच बसला. समोर सीनिअर महिला वकील होती. तिने मला विचारलं, 'हा माणूस तुला त्रास देतोय का? त्याने थोड्यावेळापूर्वीच मलाही हात लावला'. नंतर तिने मला बाजूला केलं आणि त्याला कानाखाली मारली.'
7 / 8
'मी त्या महिला वकिलाचे आभार मानेन कारण तिच्यामुळे त्या माणसाला अद्दल घडली. कारण मी इतक्या धक्क्यात होते की मला बोलताही येत नव्हतं.'
8 / 8
निम्रत कौरने 'छोटी सरदारनी' मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तिने 'इश्क मे मरजावा २','शक्ती' या मालिकांमध्येही काम केलं. 'LSD 2' या सिनेमातही ती दिसली होती.
टॅग्स :सेलिब्रिटीविनयभंगसर्वोच्च न्यायालय