Join us

अभिनेत्रीने ६ वर्षांनी घेतला घटस्फोट, आईवर झाला गंभीर परिणाम; घराबाहेर पडणंही केलं होतं बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:39 IST

1 / 8
सोशल मीडियावर एका अभिनेत्रीची चर्चा आहे. कॉमेडी स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते अभिनेत्री अशा विविध माध्यमांतून ती समोर आली आहे.
2 / 8
ही आहे अभिनेत्री कुशा कपिला(Kusha Kapila). तिने भूमी पेडणेकर, शिल्पा शेट्टी सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. तसंच अनेक कॉमेडी शोजमध्ये तिने परफॉर्म केलं आहे.
3 / 8
कुशा २०२३ साली खूप चर्चेत आली होती. ६ वर्षांचा संसार मोडत तिने घटस्फोट जाहीर केला. जोरावर सिंह अहलूवालियापासून ती विभक्त झाली.
4 / 8
कुशाच्या घटस्फोटामुळे तिच्या आईवर परिणाम झाला होता. ते धक्क्यात होते. तिच्या आईने तर लोकांमध्ये जाणंही सोडलं होतं. चार ओळखीचे भेटतील म्हणून मंदिरातही जाणं बंद केलं होतं.
5 / 8
'वी आर युवा' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कुशा कपिलाची आई रिता म्हणाल्या, 'लोकांचे प्रश्न आणि जजमेंटच्या भीतीने मी घराबाहेरच पडत नव्हते. अशा परिस्थितीत माझ्या पतीने मला समजून घेतलं.'
6 / 8
त्या पुढे म्हणाल्या, 'जेव्हा मुलीच्या घटस्फोटाची बातमी येणार होती त्याआधीपासूनच मी मंदिरात जाण्याची माझी वेळच बदलली. कोणी मला भेटावं आणि मला प्रश्न विचारावे हे मला नको होतं. मी उगाच घाबरतीये कोणी काही बोलणार नाही असं पतीने मला समजावलं.'
7 / 8
पण एक दिवस मंदिरात गेल्यावर एका महिलेने मला प्रश्न विचारलाच. तेव्हा मला थेट रडूच कोसळलं होतं. पण ही काही फार मोठी गोष्ट नाही. आयुष्य आहे अशा गोष्टी होत राहतात असं पती म्हणाले. त्यांनी नातेवाईकांना माझ्याशी यावर न बोलायचं असं स्पष्ट केलं. '
8 / 8
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाने कुशाच्या घटस्फोटावरुन घाणेरडे जोक केले होते. यानंतर कुशाने त्याला सोशल मीडियावरुन खडेबोल सुनावले होते.
टॅग्स :सेलिब्रिटीघटस्फोटपरिवार