1 / 7बॉलिवूडच्या पिटाऱ्यात अनेक किस्से सापडतात. हा रंजक किस्सा अशाच एका सिनेमाच्या सेटवर घडलेला. हा सिनेमा म्हणजे 'चाची ४२०'. कमल हासनचा हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा फेव्हरेट सिनेमा2 / 7या सिनेमात सध्याची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री फातिमा सना शेखने काम केलं होतं. फातिमा तेव्हा खूप लहान होती. तिने कमल हासनच्या लेकीची भूमिका साकारली होती. 3 / 7कमल हासनसाठी या सिनेमात भरपूर मेकअपची गरज असायची. त्यामुळे त्याच्यासाठी खास मेकअप आर्टिस्ट यायचा. हा आर्टिस्ट एक मोठा डबा घेऊन सेटवर यायचा. 4 / 7फातिमा तेव्हा फक्त ४ वर्षांची होती. एकदा तिने मेकअप बॉक्स उघडला. बॉक्स उघडताच तिला आतमध्ये असलेले सर्व रंग दिसले. निरागस फातिमाने सर्व रंग एकमेकांमध्ये मिक्स केले.5 / 7जेव्हा कमल हासनवर मेकअप करायची वेळ आली तेव्हा सर्व मेकअपचं सामान आणि रंग अस्ताव्यस्त झाले होते. फातिमाने हे केलंय असं समजताच तिला खूप ओरडा मिळाला. 6 / 7इतकंच नव्हे 'चाची ४२०'च्या साहाय्यक दिग्दर्शकाने फातिमाच्या कानाखाली लगावली. जेव्हा फातिमाच्या घरी ही गोष्ट समजली तेव्हा आई-बाबांकडूनही तिला मार खावा लागला.7 / 7पण कमल हासनने हे प्रकरण शांत केलं. फातिमा लहान असल्याने तिने नकळतपणे असं केलं असं अभिनेत्याने सर्वांना समजावलं. अशाप्रकारे फातिमाने हा रंजक किस्सा एका पॉडकास्टमध्ये सांगितला.