By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:16 IST
1 / 7आपण सिनेसृष्टीत अनेक कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या ऐकतो. कठीण काळात एकमेकांची साथ न देता हे कलाकार एकमेकांपासून वेगळे होतात. पण असा एक अभिनेता आहे ज्याने पत्नीला ४ वेळा कॅन्सर झाला असूनही तिची साथ न सोडता तिच्यामागे खंबीरपणे उभा राहिला.2 / 7हा अभिनेता म्हणजे शरीब हाश्मी. द फॅमिली मॅन या वेबसीरिजच्या माध्यमातून शरीब हाश्मी जे के तळपदे या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. शरीबची संघर्षाची कहाणी वाचून तुमचेही डोळे पाणावतील.3 / 7शरीब हाश्मी अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या पत्नीचा उल्लेख 'रिअल हिरो' असा करतो. 'माझ्या पत्नीने जो संघर्ष केला आहे, त्यासमोर माझा संघर्ष काहीच नाही,' असे तो अत्यंत अभिमानाने सांगतो.4 / 7१९९८ मध्ये शरीबची नसरीन यांना पहिल्यांदा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून आजवर त्यांनी चार वेळा या आजाराचा सामना केला आहे. प्रत्येक वेळी खचून न जाता त्यांनी अत्यंत धैर्याने हा लढा दिला आणि त्यात त्या विजयी ठरल्या. या काळात शरीब पत्नीच्या मागे खंबीरपणे उभा होता.5 / 7शरीब आणि नसरीन यांचे लग्न २००३ मध्ये झाले होते. तेव्हापासून ही जोडी प्रत्येक संकटात एकमेकांच्या सोबतीने उभी आहे.6 / 7सुरुवातीच्या काळात शरीबकडे इंडस्ट्रीत इतकं काम नव्हतं. तीन वर्ष कामाची कमतरता असल्याने शरीबला राहातं घर विकावं लागलं.7 / 7याही काळात शरीबला आणि बायकोने एकमेकांवर विश्वास ठेवला आणि साथ दिली. आज शरीब एक यशस्वी अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत चर्चेत आहे