Join us
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यात मंगळसूत्र घालून गाणार...!; प्रसिद्ध गायकाने घेतलेला मोठा निर्णय, कारण वाचून व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:16 IST

1 / 7
एका प्रसिद्ध गायकाने गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण जाणून घेताच तुम्हीही भावुक व्हाल. हा कलाकार आहे गायक पलाश सेन
2 / 7
पलाश सेन हा सुप्रसिद्ध गायक आहे. अनेकदा स्टेज परफॉर्मन्सच्या वेळी पलाशच्या गळ्यात एक मंगळसूत्र दिसते, जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते.
3 / 7
पुरुषाने मंगळसूत्र घालणं ही आपल्या संस्कृतीत असामान्य गोष्ट मानली जाते. पण पलाश सेन यांनी यामागचं अत्यंत भावूक कारण एका मुलाखतीत उघड केले आहे.
4 / 7
पलाश सेन जे मंगळसूत्र घालतात ते त्यांच्या आईचं आहे. त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर आईने ते घालणं सोडून दिलं होतं.
5 / 7
वडिलांच्या निधनानंतर आईला आलेल्या एकटेपणाची आणि तिच्या त्यागाची जाणीव ठेवून पलाश यांनी ते मंगळसूत्र स्वतः घालायला सुरुवात केली.
6 / 7
पलाश याविषयी म्हणाला की, ''माझे वडील वारल्यानंतर आईने ते मंगळसूत्र घालणं बंद केलं. मग मी ते मंगळसूत्र घालायला सुरुवात केली. प्रामुख्याने स्टेज परफॉर्मन्स वेळी मी मंगळसूत्र घालतो. मला असं वाटतं की, आईचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत आहे.'
7 / 7
पलाश सेन हे केवळ मंगळसूत्रच नाही, तर त्यासोबत खारतौश (Khartoush) नावाचं एक इजिप्शियन लॉकेटही घालतात. या लॉकेटमध्ये त्यांनी आई-वडिलांची नावं इजिप्शियन चित्रलिपीत कोरलेली आहेत
टॅग्स :मराठी चित्रपटटेलिव्हिजन